महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे करणार राष्ट्रवादीत प्रवेश - sinnar NCP

सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. सरकार द्वेषाच्या भावनेने गुन्हे दाखल करत असून, जनतेला अशा प्रकारचे राजकारण अभिप्रेत नसल्याचे वक्तव्य त्यांनी केले.

सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे करणार राष्ट्रवादीत प्रवेश

By

Published : Oct 2, 2019, 3:18 PM IST

नाशिक - सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. विधानसभा निवडणुकांमध्ये सध्या युतीकडे इनकमिंग चालू आहे. अशातच सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे हे आपली शरद पवारांवर असलेली निष्ठा सिध्द करत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत.

सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे करणार राष्ट्रवादीत प्रवेश

सरकार द्वेषाच्या भावनेने गुन्हे दाखल करत असून, जनतेला अशा प्रकारचे राजकारण अभिप्रेत नसल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना व भाजपमध्ये कोणीही अभ्यासू नेता नसल्याचे ते म्हणाले आहेत.

सरकारने आश्वासने दिल्यानंतरही अद्याप शेतकऱ्यांचे विम्याचे पैसे अडकले आहेत. युती सरकारने शेतकऱ्यांसाठी कोणतेही काम न केल्याची टीका माणिकराव कोकाटे यांनी केली. तसेच या विधानसभा निवडणुकीत आघडी सरकार सत्तेत येणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सत्ताधाऱ्यांनी एकाही प्रश्नाला न्याय दिला नसल्याने जनतेच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष असल्याचे कोकाटे म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details