महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कचऱ्यात सापडलेल्या चार तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या घंटागाडी कर्मचाऱ्याने महिलेला केल्या परत...

नाशिकला घंटा गाडी कर्मचाऱ्याने अनवधानाने कचऱ्याच्या बॅगेत गेलेल्या चार तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या परत केल्या. त्यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

nashik
घंटागाडी कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा

By

Published : Dec 18, 2019, 1:29 PM IST

नाशिक -अनवधानाने कचऱ्याच्या बॅगेत गेलेल्या ४ तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या घंटागाडी कर्मचारी ज्ञानेश्वर साळुंखे यांनी परत केल्या आहेत. ज्ञानेश्वर यांनी दाखवलेल्या माणुसकीमुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

घंटागाडी कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा

सध्या सर्वच व्यक्ती पैशाच्या मागे धावत असल्याचे आपण पाहतो. अशातच एखादी सापडलेली वस्तू परत करण्याची वृत्ती ही कमी होत चालली आहे. नाशिकच्या पाथर्डी भागातील दामोदर परिसरात राहणाऱ्या एका महिलेने नेहमीप्रमाणे घंटागाडीत कचऱ्याचा डबा दिला. परंतु, घंटागाडी निघून गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, कचऱ्याच्या डब्यातील गुलाबजामच्या डब्यात ४ तोळे सोन्याच्या बांगड्या ठेवल्या होत्या आणि तो डबाही आपण कचऱ्यासोबत टाकला.

हेही वाचा - दिंडोरीत अचानक आलेल्या धुक्याच्या लाटेने द्राक्ष बागायतदार धास्तावले

त्यांनी तत्काळ कचरा डेपो गाठले. त्यानंतर या गाडीवर असलेल्या २ कर्मचाऱ्यांनी संपूर्ण घंटागाडी खाली करत गुलाबजामचा डबा शोधून काढला आणि त्या सोन्याच्या बांगड्या सदर महिलेला परत केल्या. ज्ञानेश्वर साळुंके आणि त्याच्या सहकाऱ्यांने दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हेही वाचा -बांधकाम ठेकेदाराची गळफास घेऊन आत्महत्या

ABOUT THE AUTHOR

...view details