महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिक : अवाजवी बिल आकारल्याने ३२ रुग्णालयांना मालेगाव महापालिकेच्या नोटिसा

रुग्णांकडून अवाजवी बीले वसूल करणाऱ्या मालेगावच्या 32 रुग्णालयांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

मालेगाव महापालिका
नाशिक : अवाजवी बिल आकारल्याने ३२ रुग्णालयांना मालेगाव महापालिकेच्या नोटिसा

By

Published : May 31, 2021, 10:03 PM IST

नाशिक - मालेगाव शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांकडून अवाजवी बिले आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्याने महापालिका प्रशासनाने ३२ रुग्णालयांना नोटिसा बजावत कोरोना रुग्णांकडून अवाजवी बिले न आकारण्याबाबत समज देण्यात आली आहे.


मालेगाव महापालिकेचा मुजोर रुग्णालयांना दणका
कोरोना महामारीचा फायदा उचलत जिल्ह्यातील अनेक ठिकाणी हॉस्पिटल्स रुग्णाकडून अव्वाच्या सव्वा बिल आकारत, त्यांची आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचे अनेक प्रकार समोर आलेत. अशा रुग्णालयांवर कारवाई करण्याचे आदेश देखील जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले होते. मात्र तरीही रुग्णांकडून अवाजवी बिल आकारले जात असल्याचे प्रकार पुन्हा पुन्हा समोर येत आहेत. अशाच रुग्णांकडून अवाजवी बीले वसूल करणाऱ्या मालेगावच्या 32 रुग्णालयांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मालेगाव शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांकडून अवाजवी बिले आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्याने महापालिका प्रशासनाने ३२ रुग्णालयांना नोटिसा बजावत कोरोना रुग्णांकडून अवाजवी बिले न आकारण्याबाबत समज देण्यात आली आहे.

वाढीव बिले आकारत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने कारवाई
रुग्णालयातील एकूण खाटांच्या संख्येत ८० टक्के खाटा ह्या कोरोना रुग्णांसाठी आरक्षित ठेवणे बंधनकारक असल्याचे देखील या नोटीसीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, खाजगी रुग्णालयांनी कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्याच्या एक दिवस किंवा तीन तास आधी पूर्व लेखापरीक्षण केलेली बिले रुग्णांना द्यावीत. लेखापरीक्षण न केलेले बिल अदा केल्याची तक्रार आल्यास संबंधित हॉस्पिटलची नोंदणी, परवाना रद्द करत कारवाई केली जाईल, असे शेवटी या नोटीसीत नमूद करण्यात आले आहे. यामुळे रुग्णांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या मुजोर रुग्णालयांना चांगलाच दणका महापालिकेने दिला असून आतातरी रुग्णांकडून अवाजवी बिल आकारणी थांबेल, असा विश्वास यामुळे व्यक्त केला जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details