येवला - ओबीसी राजकीय आरक्षण रद्द करण्यास महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याची प्रतिक्रिया माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे येवला दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तसेच ओबीसी आरक्षणाचा प्रश्न भुजबळ यांनी स्वतःला हातळावा भारतीय जनता पार्टी त्यांच्या सोबत राहील अशी प्रतिक्रिया मंत्री बावनकुळे यांनी दिली.
ओबीसी आरक्षण रद्द करण्याला महाविकास आघाडी जबाबदार - चंद्रशेखर बावनकुळे - mahavikas aghadi is responsible for obc reservation
महाविकास आघाडी सरकार भ्रष्टाचारी असल्याचा घणाघाती आरोप माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. भाजप सरकारच्या काळात कोणत्याही शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करण्यात आले नाही. तसेच लोडशेडिंग होऊ दिलं नाही. मात्र, महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचे वीज कट केली.
चंद्रशेखर बावनकुळे
Last Updated : Jul 24, 2021, 1:19 PM IST