महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कारवाईचा लाभ घेणे हे पवारांचे राजकारण - भांडारी

कारवाईचा लाभ घेणे हे पवारांचे राजकारण आहे, असा आरोप भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी केली आहे.

माधव भंडारी

By

Published : Sep 28, 2019, 5:19 PM IST

Updated : Sep 28, 2019, 8:25 PM IST

नाशिक- कारवाईचा लाभ घेणे म्हणजे पवारांचे राजकारण आहे, असा आरोप भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी केला. शुक्रवारी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार ईडी कार्यालयास भेट देणार होते. परंतु, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी भेट देणे टाळले होते. हे सर्व कारवाईचा लाभ घेत पवार राजकारण करत असल्याचा आरोप भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी केला आहे.

बोलताना माधव भांडारी

ते पुढे म्हणाले, अजित पवारांचा राजीनामा वैयक्तिक निर्णय आहे. तो त्यांचा कौटुंबीक निर्णय आहे, असे म्हणत त्यांनी अजित पवार यांच्या राजीनाम्याबाबत बोलणे टाळणे.

हेही वाचा - या वयात पवारांना बदनामी सहन करावी लागते, हे पटलं नाही - अजित पवार

Last Updated : Sep 28, 2019, 8:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details