महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विनयभंग करणाऱ्या तडीपार गुंडाचे ऑफिस गावकऱ्यांनी जाळले - गुंड

लोहोणेर गावातील तडीपार गुंड स्वप्नील निकम उर्फ मिरची भैय्याने काही दिवसांपूर्वी विधवा महिलेचा विनयभंग केला. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी मिरची भैय्याचे ऑफिस पेटवून दिले.

विनयभंग करणाऱ्या तडीपार गुंडाचे ऑफिस गावकऱ्यांनी जाळले

By

Published : Apr 23, 2019, 8:07 PM IST

नाशिक - जिल्ह्यातील लोहोणेर गावातील तडीपार गुंड स्वप्नील निकम उर्फ मिरची भैय्याने काही दिवसांपूर्वी विधवा महिलेचा विनयभंग केला. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी मिरची भैय्याचे ऑफिस पेटवून दिले. तर तडीपार गुंडाला देवळा पोलीस अभय देत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील लोहणेर येथील पीडित महिलेच्या पतीचे एका वर्षापूर्वी निधन झाले असून मुली शिक्षणानिमित्त बाहेरगावी असतात. ती महिला घरी एकटीच असते. ही संधी साधून स्वप्निल निकम उर्फ मिरची भैया काही दिवसापूर्वी पीडित महिलेच्या घरी गेला आणि शारीरिक सुखाची मागणी केली. या प्रकाराची माहिती महिलेने तिच्या कुटुंबीयांना दिली.


तेव्हा १७ एप्रिलला स्वप्निल मिरची भैया विरुद्ध देवळा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आरोपी मिरची भैय्या गावातून पळून गेला. त्याचा शोध पोलीस घेत होते. मात्र, मिरची भैय्या पोलिसांना सापडत नसल्याकारणाने लोहोनेरच्या गावकऱ्यांनी मिरची भैय्याच्या ऑफिसची जाळपोळ करून पोलीस प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. यावेळी झालेली गर्दीला हटवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला.


स्वप्निल निकम हा सराईत गुन्हेगार असून देवळा पोलीस ठाण्यात त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत. त्याच्यावर काही दिवसांपूर्वी तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. तडीपारीचे आदेश असतानाही त्याने आदेशाचा भंग करत विनयभंगासारखा गंभीर गुन्हा केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details