नाशिक -कोरोना विषाणूमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा परिणाम मनुष्याच्या दैनंदिन जीवनासोबतच भारतीय सणवारांवर देखील झाला आहे. अक्षय तृतीयाच्या दिवशी पूजेला लागणाऱ्या कराव केळी ( मातीची मडकी) वर देखील मोठा परिमाण झाला आहे. मातीची वस्तू घडवणाऱ्या कलाकारांचे दरवर्षीपेक्षा यावर्षी 50 टक्केहून अधिक नुकसान झाले आहे.
कोरोना इफेक्ट : लॉकडाऊनचा परिणाम मातीच्या वस्तु विक्रीवरही.. व्यावसायियकांचे 50 टक्केहून अधिक नुकसान - अक्षयतृतीया
लॉकडाऊनचा परिणाम अक्षय तृतीयाच्या दिवशी पूजेला लागणाऱ्या कराव केळी ( मातीची मडकी) वर देखील मोठा झाला आहे. मातीची वस्तू घडवणाऱ्या कलाकारांचे दरवर्षीपेक्षा यावर्षी 50 टक्केहून अधिक नुकसान झाले आहे..
लॉकडाऊनचा परिणाम मातीच्या वस्तु विक्रीवरही
दरवर्षी हे व्यावसायिक 10 ते 12 हजार कराव केळीची विक्री करतात. मात्र यावर्षी 1 ते 2 हजाराच्या करावकेळीची विक्री झाल्याचे व्यावसायिक सांगतात. त्यामुळे इतर उद्योग धंद्यासोबत मातीची वस्तू घडवणाऱ्या कष्टकरी कलाकारांना देखील लॉकडाउनचा मोठा फटका बसला आहे.