महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशकात बिबट्याची चक्क लष्कराच्या 'विजय' रणगाड्यावर विश्रांती - lepord nashik

देवळालीतील लष्कर हद्दीत बिबट्याने चक्क 'विजय' रणगाड्यावर ठाण मांडून बसल्याचे दिसत आहे. ही घटना लष्कराच्या खंडोबा टेकडी भागातील आहे. यावेळी बिबट्याने रणगाड्यावर काही वेळ विश्रांती देखील घेतली.

नाशकात बिबट्याची चक्क लष्कराच्या 'विजय' रणगाड्यावर विश्रांती

By

Published : Nov 6, 2019, 4:30 PM IST

नाशिक - देवळालीतील लष्कर हद्दीत बिबट्याने चक्क 'विजय' रणगाड्यावर ठाण मांडल्याचे दिसत आहे. ही घटना लष्कराच्या खंडोबा टेकडी भागातील आहे. यावेळी बिबट्याने रणगाड्यावर काही वेळ विश्रांती देखील घेतली. तसेच फोटोसाठी नागरिकांना पोज देखील दिली. मात्र, नागरिकांची गर्दी वाढल्याने बिबट्याने बाजूच्या जंगलात पलायन केले. बिबट्या फोटो सेशनसाठी आला असल्याची खुमासदार चर्चा देखील रंगली होती.

नाशकात बिबट्याची चक्क लष्कराच्या 'विजय' रणगाड्यावर विश्रांती
नाशकात बिबट्याची चक्क लष्कराच्या 'विजय' रणगाड्यावर विश्रांती

हेही वाचा - 'ईटीव्ही भारत'च्या वृत्ताने टोल कंपनीला आली जाग; इंदूर पुणे मार्गावर डागडुजीला सुरुवात

बिबट्याचे देवळाली लष्कर हद्दीत गेल्या अनेक दिवसांपासून मुक्त संचार असल्याने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. काही दिवसांपूर्वी एका वासराला बिबट्याने भक्ष देखील केले होत. तसेच अनेक नागरिकांना या बिबट्याचे दर्शन होत असल्याने वारंवार भक्ष्याच्या शोधात नागरी वस्तीकडे येणाऱ्या या बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे.

नाशकात बिबट्याची चक्क लष्कराच्या 'विजय' रणगाड्यावर विश्रांती

हेही वाचा - शिवसेनेशी जुळवून घ्या, सरसंघचालकांचा फडणवीसांना सल्ला

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details