महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दोनवाडे शिवारात बिबट्या जेरबंद; इतर बिबट्यांनाही जेरबंद करण्याची मागणी - दोनवाडे शिवार

जिल्ह्यातील भगूर, सिन्नर, निफाड, इगतपुरी, चांदवड हे तालुके बिबट्याचे हॉटस्पॉट आहेत. या तालुक्यातून गोदावरी, दारणा आणि कादवा ह्या नद्या प्रवाहित होत असून ह्या नद्यांच्या आजुबाजूला ऊसाचे मोठे क्षेत्र आहे. अशात बिबट्यांना लपण्यासाठी उसाचे शेत ही सुरक्षित जागा असल्याने बिबट्यांच्या वावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असतो.

बिबट्या जेरबंद
बिबट्या जेरबंद

By

Published : Jul 13, 2021, 4:58 PM IST

नाशिक - नाशिकच्या भगूरनजीक असलेल्या दोनवाडे शिवारात मानवी वस्तीत लावलेल्या पिंजऱ्यात नर जातीचा बिबट्या जेरबंद झाला. या भागात एकूण तीन बिबट्यांचा वावर असल्याने शेतकरी, रहिवाशी व जवळील कॉलनीतील नागरिक भयभीत झाले होते. अनेक नागरिकांना या बिबट्यांने दर्शन दिले. रात्रीच्या वेळी अनेक कुत्र्यांची शिकार या बिबट्यांनी केली असून शेतकरी आपले पाळीव प्राणी वाचवण्यासाठी परिश्रम घेत आहे.

दोनवाडे शिवारात बिबट्या जेरबंद

याबाबत येथील नागरिकांनी वन विभागाशी संपर्क साधला असता नाशिक वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनअधिकारी विजय पाटील, अनिल आहेरराव यांनी पाच दिवसांपूर्वी सत्यवान कागणे यांच्या ऊसाच्या शेतात बिबट्यासाठी पिंजरा लावला. या पिंजऱ्यात आज (मंगळवार) पहाटे बिबट्या जेरबंद झाला. बिबट्याचा आवाज आल्याने नागरिकांनी त्यादिशेने धाव घेतली असता पिंजऱ्यात नर जातीचा बिबट्या जेरबंद झाल्याचा दिसला. तसेच अजून दोन बिबटे या भागात असून पुन्हा पिंजरा लावावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

निफाड, सिन्नर, इगतपुरी बिबट्याचे हॉटस्पॉट -

जिल्ह्यातील भगूर, सिन्नर, निफाड, इगतपुरी, चांदवड हे तालुके बिबट्याचे हॉटस्पॉट आहेत. या तालुक्यातून गोदावरी, दारणा आणि कादवा ह्या नद्या प्रवाहित होत असून ह्या नद्यांच्या आजुबाजूला ऊसाचे मोठे क्षेत्र आहे. अशात बिबट्यांना लपण्यासाठी उसाचे शेत ही सुरक्षित जागा असल्याने बिबट्यांच्या वावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असतो. यासोबत मुबलक पाणी आणि गावात भक्ष्य म्हणून बिबट्यांना शेळ्या-मेंढ्या तसेच भटकी कुत्री मिळत असल्याने बिबट्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. वनविभागाच्या एका सर्वेक्षणानुसार नाशिक जिल्ह्यात जवळपास 200 हून अधिक बिबटे असल्याचे समोर आले आहे. अनेकदा काही बिबटे भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीकडे येत असल्याचे दिसून आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details