नाशिक - जिल्ह्यातील इगतपुरीत तालुक्यातील वाघोरे येथे एका बिबट्याचा गंभीर जखमी अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. या बिबट्याच्या पोटावर खोलवर जखमा असून दोन बिबट्याच्या झटापटीत एका बिबट्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.
नाशकात आढळला बिबट्याचा मृतदेह - नाशिक बिबट्या मृत्यू बातमी
इगतपुरीत तालुक्यातील वाघोरे येथे तुकाराम भोर यांच्या शेतात नदीकडे जाणाऱ्या पाची आंबे या भागात दोन वर्षाचा बिबट्या गंभीर जखमी अवस्थेत मृत आढळून आला. त्याच्या पोटावर खोलवर जखमा झाल्या होता.
इगतपुरीत तालुक्यातील वाघोरे येथे तुकाराम भोर यांच्या शेतात नदीकडे जाणाऱ्या पाची आंबे या भागात दोन वर्षाचा बिबट्या गंभीर जखमी अवस्थेत मृत आढळून आला. त्याच्या पोटावर खोलवर जखमा झाल्या होता. यावेळी माजी सरपंच मोहन भोर यांनी वन विभागाला याची माहिती दिली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून दोन बिबट्याच्या झटापटीत एका बिबट्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तवला आहे. यावेळी वन विभागाचे अधिकारी रमेश ढोमसे, दत्तू ढोणर, सुरेश आव्हाड आदी उपस्थित होते.
दरम्यान, गंभीर जखमी झाल्याने बिबट्याचा मृत्यू झाला असून, मृत्यूनंतर त्याचे दात, नखे आणि कातडी तशीच आहे. शिकारीच्या दृष्टीने त्याची हत्या करण्यात आली असती, तर या गोष्टी शिकाऱ्याने नेल्या असत्या. मात्र, प्रथम दर्शी दोन बिबट्यात मोठी झटापट झाली असून त्यात एकाच मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.