महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Lalit Patil Case Update : ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात माजी महापौरांची पोलिसांकडून चौकशी - ललित पाटील केस अपडेट

Lalit Patil Case Update: ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil case) याच्याशी संबंधित असलेला अर्जुन परदेशी (Arjun Pardeshi) हा काही वर्षांपूर्वी माजी महापौर विनायक पांडे यांच्या गाडीवर चालक म्हणून कार्यरत होता. या अनुषंगाने नाशिक पोलिसांनी माजी महापौर पांडे यांना नोटीस पाठवत चौकशीला बोलवलं होतं. अशात आज पांडे यांची पोलिसांनी चौकशी केली. मात्र, माझा आणि ललित पाटीलचा काहीच संबध नाही, असं पांडे यांनी पोलिसांना सांगितलं. पोलीस चौकशी नंतर पांडे यांनी माध्यमांना माहिती दिली.

Lalit Patil Case Update
विनायक पांडेंची पोलिसांकडून चौकशी

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 27, 2023, 8:18 PM IST

पोलीस चौकशी विषयी विनायक पांडे यांची प्रतिक्रिया

नाशिकLalit Patil Case Update: शहरात गाजत असलेल्या ड्रग्ज प्रकरणी नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे यांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. (former mayor Vinayak Pandey) गेल्या अनेक दिवसांपासून ड्रग्ज माफिया ललित पाटील याचे कोणाकोणाशी संबंध होते, त्याचा संपर्कात कोणकोणते राजकीय पुढारी होते याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. प्रथम मुंबईचे साकीनाका पोलीस त्यानंतर नाशिक पोलीस आणि पुणे पोलिसांकडूनही ललित पाटील त्याचा भाऊ भूषण पाटील आणि इतर साथीदारांची चौकशी सुरू आहे. (police investigation of Vinayak Pandey) त्यातच नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे यांच्या वाहनावर असलेला चालक अर्जुन परदेशी हा ललित पाटीलशी संबंधित असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी पांडे यांच्या वाहनचालकाची देखील चौकशी केली होती. आता या प्रकरणात आणखी काही धागेदोरे मिळतात का? यासाठी पहिल्यांदाच एका राजकीय पदाधिकाऱ्याची चौकशी केली जात आहे.


'त्याला' कामावरून काढून टाकले होते:ललित पाटीलशी संबंधित असलेल्या अर्जुन परदेशी बाबत पोलिसांनी मला विचारलं. मी त्यांना सांगितलं की, अर्जुन परदेशी हा माझ्या गाडीवर 10 ते 12 वर्षे चालक म्हणून होता. शुगरचा प्रॉब्लेम झाल्याने त्याला रात्री व्यवस्थित दिसत नव्हतं म्हणून मी त्याला कामावरून काढून टाकलं होतं. तो माझ्याकडे कामाला होता तेव्हा दोन ते साडेपाच पर्यंत त्याला सुट्टी असायची, या मधल्या काळात त्यानी काय केलं याबाबत मला माहिती नाही. ललित पाटीलनं जेव्हा शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा मी कुठल्याही पदावर नव्हतो. त्यावेळेसचे शिवसेना शहरप्रमुख यांनीच उद्धव ठाकरेंची वेळ घेऊन त्याला पक्षात प्रवेश दिला. यापुढे पोलिसांनी मला चौकशीसाठी बोलावलं तर मी त्यांना सहकार्य करेल, असेही मी त्यांना सांगितलं असल्याचं माजी महापौर विनायक पांडे यांनी म्हटलं.

ललित हा पांडेंचा कार्यकर्ता:ललित पाटील याचे खासदार हेमंत गोडसे आणि अजय बोरस्ते यांच्या सोबतचे फोटो व्हायरल झाले. यानंतर ललित पाटील हा विनायक पांडेंचाच कार्यकर्ता असून त्यांच्या आग्रहास्तवच त्याला शिवसेनेत प्रवेश दिला. मी केवळ महानगरप्रमुख म्हणून तेथे उपस्थित होतो, असा खुलासा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी केला. ललित पाटील याचा आणि माझा दूरदूर पर्यंत संबंध नाही असंही बोरस्ते म्हणाले.


माझ्याकडे पोलिसांनी चौकशी केली:माझा गॅरेजचा व्यवसाय आहे. माझ्याकडे सात ते आठ वर्षांपूर्वी ललित पाटील याने त्याची सफारी गाडी दुरुस्तीसाठी लावली होती; पण त्या काळात त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला आणि पोलिसांनी त्याला जेलमध्ये ठेवले, असं समजलं. त्यानंतर त्यानेही गाडीसाठी फोन केला नाही आणि मी ही संपर्क केला नाही. माझेच गाडी दुरुस्तीचे 25 हजार रुपये त्याच्याकडे बाकी आहे. दोन दिवसांपूर्वी पोलीस माझ्याकडे आले होते. त्यांना देखील मी हीच माहिती दिली, असं गॅरेज व्यावसायिक रवी नायर याने सांगितलं.

हेही वाचा:

  1. Lalit Patil Drugs Case : ललित पाटील प्रकरणी ससूनच्या डॉ. संजीव ठाकूर यांना सहआरोपी करून नार्को टेस्ट करा; सुषमा अंधारेंची मागणी
  2. Lalit Patil Case Update : ललित पाटील ड्रग्ज प्रकरण; 'या' कारणामुळे पोलीस करणार माजी महापौरांची चौकशी...
  3. MLA Dhangekar On Lalit Patil : ड्रग्स माफिया ललित पाटीलचा एन्काऊंटर होऊ शकतो- आमदार रवींद्र धंगेकर

ABOUT THE AUTHOR

...view details