नाशिक : सप्तशृंगी मातेच्या सव्वा फूट मूर्तीवर वर्षानुवर्ष असलेल्या शेंदूर, लाख, मेण आदी तब्बल 1100 किलो काढल्यानंतर मूळ स्वरुप समोर ( removing 1100 kg of hemlock of Saptshringi Devi ) आलं. हे मूळ स्वरुप इतकं विलोभनीय की मूर्ती एका दृष्टीक्षेपात डोळ्यात साठवणं केवळ अशक्य आहे. आता आदिशक्तीचे मूळ स्वरुप बघण्यासाठी भाविकांचे डोळे आतुर झाले ( original form of mata came forward ) आहेत.
देवी मातेच्या मूर्तीवरून 1100 किलो शेंदूर काढल्यानंतर मातेचे मूळ रूप समोरप्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेला जिल्हा म्हणून नाशिकची ओळख आहे. नाशिकला धार्मिक पौराणिक महत्त्व असून, त्र्यंबक महाराज आणि सप्तश्रृंगी देवी माता हे देशभर मान्यता पावलेली स्थाने इथल्या लौकीकात भर घालतात. आता देवी मातेच्या मूर्तीवरून 1100 किलो शेंदूर काढल्यानंतर मातेचे मूळ रूप समोर आल्याची बातमी देशभर वाऱ्यासारखी पसरली आहे. आता आदिशक्तीच मूळ स्वरुप बघण्यासाठी भाविकांचे डोळे आतुर झाले ( original form of Saptshringi Devi Mata ) आहेत. यामुळे पुढील काही दिवसात संत महात्म्यांची आणि भविकांची पावलं सप्तश्रृंग गडाकडे आदिमायेच्या दर्शनासाठी वळतील. आदिमायेचं मूळ स्वरुप झाकून त्यावर आवरणरुपी आदिशक्ती स्थापित करण्याची समयसूचकता तत्कालीन संत-महात्म्यांना कुणी दिली असेल, या प्रश्नाच्या अनुषंगाने देखील शोधकर्ते शोध घेत आहेत. परकीय आक्रमकांपासून मूळ मूर्तीला हानी पोहोचू नये, हा एक त्यातील हेतू असावा.