महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिक लोकसभा मतदारसंघात जातीय समीकरण - किरण अग्रवाल - नाशिक

नाशिकमध्ये एक लोकसभा मतदार संघ आहे. यामध्ये ३ जगा भाजप, २ जागा शिवसेनेकडे आणि १ जागा काँग्रेस पक्षाकडे आहे. यामध्ये नाशिक मध्य भागातील १७ टक्के मुस्लीम, नाशिक पूर्वमधील ३५ टक्के मराठा, नाशिक पश्चिममधील २८ टक्के ओबीसी, सिन्नर येथील ३९ टक्के वांजरी आणि इगतपुरीमधील ५४ टक्के आदिवासी मतांचा एक गठ्ठा मतदान निर्णयक ठरणार, असा अंदाज आहे.

नाशिक

By

Published : Mar 26, 2019, 5:35 PM IST

नाशिक - नाशिकमध्ये उमेदवाराची पात्रता, प्रचाराचे मुद्दे, विकासाचे धोरण, या सोबतच जात आणि धर्म हा निकष महत्वाचा मानला जातो हे आजवर झालेल्या निवडणुकीतून समोर आले आहे. यंदाही लोकसभा निवडणुकीत मराठा आणि ओबीसी समाजाची मते निर्णयाक ठरणार असल्याचे ज्येष्ठ पत्रकार किरण अग्रवाल यांनी म्हटले आहे.

ज्येष्ठ पत्रकार किरण अग्रवाल

नाशिकमध्ये ६ विधानसभा मतदार संघ तसेच एक लोकसभा मतदार संघ आहे. यामध्ये ३ जगा भाजप, २ जागा शिवसेनेकडे आणि १ जागा काँग्रेस पक्षाकडे आहे. यामध्ये नाशिक मध्य भागातील १७ टक्के मुस्लीम, नाशिक पूर्वमधील ३५ टक्के मराठा, नाशिक पश्चिममधील २८ टक्के ओबीसी, सिन्नर येथील ३९ टक्के वांजरी आणि इगतपुरीमधील ५४ टक्के आदिवासी मतांचा एक गठ्ठा मतदान निर्णयक ठरणार, असा अंदाज आहे.

नाशिक लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून समीर भुजबळ उमेदवारी करीत आहेत. तसेच भाजपचे माजी आमदार माणिकराव कोकाटेदेखील बंडखोरी करत अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत. वंचित आघाडीकडून पवन पवार यांना उमेदवारी जाहीर झाली असून नाशिकमधून मराठा मोर्चाचे नेतृत्व करणारे करण गायकर यांनीदेखील निवडणूक लढवण्यासाठी तयारी केली आहे.

असे आहेत समाज निहाय मतदार -

  1. मराठा समाज - ३ लाख ५९ हजार ८५५
  2. अनु. जमाती - २ लाख ५२ हजार १८६
  3. वंजारी समाज - १ लाख ९७ हजार ६६४
  4. मुस्लीम समाज - १ लाख ९६ हजार १६५
  5. कुणबी समाज - १ लाख ९० हजार ३७
  6. अनु. जाती - १ लाख ८३ हजार ३०५
  7. माळी समाज - १ लाख ३२ हजार ९८५
  8. धनगर समाज - ८४ हजार ४९९
  9. लिंगायत समाज - ३ हजार ५९०
  10. आगरी समाज - ८ हजार ५१५
  11. इतर समाज - १ लाख ९४ हजार ९५

ABOUT THE AUTHOR

...view details