नाशिक- सार्वजनिक आरोग्य सेवेचा दर्जा सुधारावा याकरिता सुरू केलेल्या कायाकल्प योजनेत नाशिकच्या जिल्हा रुग्णालयाने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. नाशिक जिल्हा रुग्णालयाने राज्यभरातील सरकारी रुग्णालयांना मागे टाकत प्रथम क्रमांक पटकावला असल्याने रुग्णालयाला तब्बल ५० लाखांचे बक्षीस जाहीर झाले आहे.
कायाकल्प पुरस्कारात नाशिक दुसऱ्यांदा अव्वल, ५० लाखांचे बक्षीस जाहीर - award
जिल्हा शासकीय रुग्णालयात कामे करणारे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सांघिक प्रयत्नांचे यश म्हणजे जिल्हा रुग्णालयाला मिळालेला हा पुरस्कार आहे. या सर्वांच्या प्रयत्नाने आणि सहकार्याने जिल्हा रुग्णालय आपली मोहोर उमटवू शकले
यासोबतच राज्यातील पहिल्या २५ रूग्णालयांमध्ये नाशिक जिल्ह्यातील ११ सहकारी रुग्णालयांचा समावेश असून त्यांनाही प्रत्येकी एक लाखाचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये त्र्यंबक, कळवण, निफाड, इगतपुरी, नांदगाव ,घोटी, डांगसौदाणे, लासलगाव, वणी, दाभाडी, देवळा या ग्रामीण रूग्णालयांचा समावेश आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयात कामे करणारे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सांघिक प्रयत्नांचे यश म्हणजे जिल्हा रुग्णालयाला मिळालेला हा पुरस्कार आहे. या सर्वांच्या प्रयत्नाने आणि सहकार्याने जिल्हा रुग्णालय आपली मोहोर उमटवू शकले, ही नाशिककरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. यापुढेही अधिकाधिक चांगले काम करत रुग्णसेवा करण्याची संधी जिल्हा रुग्णालयाला मिळावी, असे डॉ. सुरेश जगदाळे यांनी म्हटले आहे.