नाशिक - मोरवाडी गाव येथे एक वयोवृद्ध राजेंद्र प्रभाकर देशमुख (वय 67) यांचे दुःखद निधन झाले. मात्र कर्फ्यू काळात निधन झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करायचे की नाही, असा प्रश्न आसपासच्या नागरिकांना पडला होता. तेव्हा त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्याची परवानगी घेतली.
नाशकात जनता कर्फ्यु आदेश पाळून चार व्यक्तीने एकत्र येत केला अंत्यविधी ही दुःखद बातमी मिळाल्यानंतर नागरिकांनी सहकार्याची भूमिका घेत गर्दी करणे टाळले. शासनाचे सर्व आदेश पाळून सर्व अंत्यविधीची तयारी केली. अवघ्या चार लोकांमध्ये अंत्यविधी पार पडला. मोरवाडी अमरधाम येथे हा अंत्यविधी झाला.
नाशकात जनता कर्फ्यु आदेश पाळून चार व्यक्तीने एकत्र येत केला अंत्यविधी आज देशभरात जनता कर्फ्यु पाळावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले होते. या आवाहनाला देशभरातून आणि राज्यातूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नुकतीच राज्यातही जमावबंदी लागू करण्यात आली आहे. ३१ मार्चपर्यंत राज्यात ही बंदी लागू राहणार आहे.
हेही वाचा - #JantaCurfew गरज नसताना घराबाहेर पडलेल्या दोघांना लाठीचा प्रसाद
हेही वाचा - महाराष्ट्र लॉकडाऊन..! कलम १४४ लागू, ३१ मार्चपर्यंत अत्यावश्यक सोडून सर्व सेवा बंद