नाशिक- कुसुमाग्रज प्रतिष्ठनाचा मानाचा समाजला जाणारा 'जनस्थान' पुरस्कार ज्येष्ठ कवी वसंत आबाजी डहाके यांना प्रदान करण्यात आला. १ लाख रुपये रोख आणि मानचिन्ह असे या पुरस्कारचे स्वरूप आहे.
'जनस्थान' हा पुरस्कार दर २ वर्षांनी दिला जातो. मागील ३० वर्षापासून दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराने आतापर्यंत १५ प्रतिभाशाली व्यक्तींना गौरवण्यात आले आहे. पुरस्काचे वितरण बुधवारी नाशिकच्या कालिदास कलामंदिर येथे संपन्न झाला.
यावेळी डहाकेंनी वि. वा. शिरवाडकर यांच्या कवितांवर भाष्य करणाऱ्या अनेक विषयांना हात घातला. समाजात घडणाऱ्या चांगल्या वाईट घडामोडींवर शिरवाडकर यांनी आपल्या कवितेतून भाष्य केले. कवितांच्या माध्यमातून समाजामधील अंतर, विरोध दाखवून देत असल्याचे डहाके यांनी सांगितले.
ज्येष्ठ कवी वसंत आबाजी डहाकेंना कुसुमाग्रज प्रतिष्ठानाचा 'जनस्थान' पुरस्कार डहाके मराठी भाषेबाबत चिंता व्यक्त करताना म्हणाले, की मराठी ही उपजीविकेची भाषा व्हावी यासाठी अनेकांनी पूर्वी खुप कष्ट घेतले आहेत. साधने नसताना गावोगावी जाऊन माहिती गोळा करणे, लिहणे, डोक्यावर ग्रंथ वाहून नेण्याचे काम करणे, अशी कामे कोषाकर केतकरांनी केली आहेत. मात्र, नंतरच्या काळात बोटावर मोजता येईल इतक्यांनी मराठी भाषेसाठी काम केले. मराठी भाषेबद्दल आपल्याला चिंता वाटत असेल, तर त्याबाबत सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन यावेळी डहाकेंनी केले.
या कार्यक्रमाला संजय भास्कर जोशी, मधूमंगेश कर्णिक, ज्येष्ठ कवी प्रभा गणोरकर, संजय पाटील, मकरंद हिंगणे तसेच नाशिककर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.