महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आरटीओ विभागातील वरिष्ठ अधिकारी गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू, निवृत्त अधिकाऱ्याने केली होती तक्रार - गुन्हे शाखा नाशिक

आरटीओ विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार निवृत्त अधिकारी गजेंद्र पाटील यांनी केली होती. पाटील यांनी या तक्रारीत आरटीओ विभागातील वरिष्ठ अधिकारी यांच्यासह परिवहन खात्याचे मंत्री यांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. पोलिसांनी देखील या तक्रारीची गंभीर दखल घेत, नाशिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू केली आहे.

आरटीओ विभागातील वरिष्ठ अधिकारी गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू
आरटीओ विभागातील वरिष्ठ अधिकारी गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू

By

Published : Jun 3, 2021, 2:53 AM IST

नाशिक - आरटीओ विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार निवृत्त अधिकारी गजेंद्र पाटील यांनी केली होती. पाटील यांनी या तक्रारीत आरटीओ विभागातील वरिष्ठ अधिकारी यांच्यासह परिवहन खात्याचे मंत्री यांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. पोलिसांनी देखील या तक्रारीची गंभीर दखल घेत, नाशिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू केली आहे. या चौकशी दरम्यान मंत्रालयातील सचिव डी. एच. कदम आणि उप सचिव प्रकाश साबळे यांची पोलिसांनी दिवसभर चौकशी केली. पुराव्यातून संपत्ती जमवल्याचा संशय वाटल्यास बँक व्यवहादेखील तपासले जाणार असल्याचे पोलीस उप आयुक्त संजय बारकुंड यांनी म्हटले आहे.

कागदपत्रे आणि जवाब नोंदवले

आरटीओ विभागचे निवृत्त अधिकारी गजेंद्र पाटील यांच्या तक्रारीवरून नाशिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू केली आहे. यात सुरवातीला मंत्रालयातील सचिव डी. एच. कदम आणि उप सचिव प्रकाश साबळे यांची चौकशी करण्यात येऊन, आरोपांशी निगडित विविध कागदपत्रे आणि त्यांचे जाब जवाब नोंदवले गेले. तसेच, तक्रारदार गजेंद्र पाटील यांना ही चौकशीसाठी बोलवण्यात येऊन त्यांची सात तास चौकशी करण्यात आली.

चौकशीसाठी पाच दिवसांची मुदत वाढ

पाच दिवसात चौकशी पूर्ण करून, अहवाल सादर करावा असे पोलीस आयुक्त दीपक पांडये यांनी आदेश दिले आहेत. मात्र, तक्रारदार पाटील ते चौकशी सुरू झाल्यानंतर चार दिवसांनी पोलिसांसमोर हजर झाले. त्यामुळे गुन्हे शाखेने चौकशीसाठी पाच दिवसांची मुदत वाढ मागितली असून, पांडये यांनी ती मान्य केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details