नाशिक:शहरात एकाच वेळी वीस हुन अधिक बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. त्यामुळे शहरातील बांधकाम क्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळीच आयकर विभागाच्या विविध पथकांनी 20 बांधकाम व्यावसायिकांच्या तब्बल 75 ठिकाणांवर छापे टाकले आहेत. नाशिका तील मेनरोडवर असलेले बांधकाम व्यावसायिकांची घरे, कार्यालय, त्यांच्या मॅनेजरसह महत्त्वाच्या व्यक्तींची घरे याठिकाणी आयकरचे पथक दाखल झाले आहेत.
IT Raid in Nashik : नाशिकमध्ये 20 हून अधिक बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाचे छापे - Income Tax Department Raids Builders
नाशिक येथे एकाच वेळी 20 हून अधिक बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालये, घरे, फार्म हाऊस आणि साईट कार्यालयांवर आयकर विभागाने छापे टाकल्याचे समोर आले आहे.
आयकर विभागाच्या हाती मोठे घबाड: या छाप्यांमध्ये नामांकीत बांधकाम व्यावसायिकांचा समावेश आहे. त्यामुळे आयकर विभागाच्या हाती मोठे घबाड लागण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. आयकर विभागाचे अधिकाऱ्यांच्या नेतृत्वातील या पथकांनी एकाचवेळी बांधकम व्यावसायिकांची कार्यालय, घरे,फार्म हाऊस आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांवर छापा टाकला आहे. 75 ठिकाणांवर जवळपास 150 पेक्षा अधिक आयकर अधिकारी व कर्मचारी दाखल असल्याचे सांगितले जाते. हे सर्व अधिकारी औरंगाबाद, मुंबई, नाशिक, पुणे येथील असल्याचे समजले आहे.
बांधकाम व्यवसायिकांचे धाबे दणाणले:आयकर विभागाच्या छाप्यांनी नाशिकच्या बांधकाम क्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे. याठिकाणी अचानक छापे पडले आहेत. त्यातच नाशिक येथील नामांकीत बांधकाम व्यावसायिकांना या छाप्यांमध्ये लक्ष करण्यात आले आहे. हे छापे नक्की कशासाठी टाकण्यात आले, हे आणखी समजू शकले नाही. आज सायंकाळपर्यंत यासंदर्भात अधिकृत माहिती मिळण्याची चिन्हे आहेत. या छाप्यात बांधकाम व्यावसायिकांकडील सर्व कागदपत्रांची छाननी, बँक खात्यांचा तपशील अशा सर्वच बाबींची पडताळणी या पथकांनी सुरू केली आहे. तसेच नाशिक शहरातील नामांकित भावेश बिल्डर, पिंकेश शहा, विलास शहा, मनोज लड्डाणी, दीपक चांदे, क्रिश डेव्हलपर्स, प्रशांत पाटील यांच्यासह आदी बांधकाम व्यवसायिकांच्या कार्यालयावर घरावर, फार्महाउसवर, साइटवर, एकाच वेळी छापे मारी करण्यात आली आहे. या छापेमारीमुळे बांधकाम व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहे. तसेच आयकर विभागाच्या मार्फत विविध ठिकाणी छापेमारी करत करबुडव्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे.
हेही वाचा: Anil Ambani 28 एप्रिलपर्यंत अनिल अंबानींवर कोणतीही कारवाई न करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश