नाशिक- दिंडोरी-वणी रस्त्यावर अवनखेड शिवारात 2 लाख 98 हजार 440 रुपयांचा देशी-विदेशी दारूसाठा वाहनासह जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कचरू बबन सोनवणे (वय 40 वर्षे, रा. शिवाजी नगर दिंडोरी) व रतन रामा गुंबाळे (वय 38 वर्षे, रा. पिंपळगाव धुम, ता. दिंडोरी) या दोघांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. 4 मार्च) नाशिकचे पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंह यांच्या आदेशानुसार वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना पथकाला अवैध वाहतुकीची माहिती मिळाली. त्यानुसार दिंडोरी ते वणी रस्त्यावर पथकाने सापळा रचला. त्यावेळी जीप (क्र. एम एच 15 ए एच 1676) या वाहनाची तपासणी केली. 1 लाख 48 हजार 440 रुपये किमतीचा देशी-विदेशी मद्यसाठा मिळाला.