नाशिक - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सुरगाणा तालुक्यातील म्हैसमाळ येते छापा टाकला. यात १६ लाख रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. तसेच, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला अवैध मद्यसाठ्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर तत्काळ सुरगाणा तालुक्यातील म्हैसमाळ येथे सापळा रचण्यात आला. एका कारमधून विक्रीसाठी नेले जाणारा मद्यसाठा जप्त करण्यात आला.