नाशिक -जिल्ह्यातीलमनमाड शहरात होळी सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. शहरातील महालक्ष्मी आई मंदिरासमोर गवळी समाजाच्यावतीने होळीची पारंपरिक पद्धतीने पूजा करण्यात आली. यानंतर होलिका दहन करण्यात आले.
मनमाड शहर परिसरात होळीचा सण उत्साहात साजरा.. हेही वाचा....'चिकन अन् अंडी हे तर पौष्टीक पदार्थ.. बिनधास्त खा, अफवांवर विश्वास ठेऊ नका!'
मनमाड शहरातील गवळी समाजाकडून महालक्ष्मी आई मंदिरासमोर दरवर्षी पारंपरिक पद्धतीने होलिका दहन उत्सव करण्यात येतो. या वर्षी देखील हा उत्सव साजरा करण्यात आला. ढोल ताशांच्या गजरात होलिका दहनाचा कार्यक्रम पार पडला. सर्व प्रथम महिलांनी नेवैद्य दाखवत होळीची पूजा केली. यानंतर पुरुष मंडळींनी होळीला अग्नी देत होलिका दहन केले.
गवळी समाजाच्या वतीने दरवर्षी होळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. शहरातील अनेक चौकात होलिका दहन करण्यात येत. अनेक ठिकाणी घरगुती छोटया छोट्या होळ्या पेटवण्यात येतात.