नाशिक - कामात अपयश आल्याने गवंडी काम करणाऱ्या व्यक्तीने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. प्रशांत निकम असे मृताचे नाव आहे.
कामाच्या तणवातून नाशिकमधील तरुणाची आत्महत्या - अंबड पोलीस ठाणे
हाती घेतलेले काम वेळेत पूर्ण झाले नाही, या कारणामुळे नाशिकमधील एका व्यक्तीने आत्महत्या केली. प्रशांत निकम असे मृताचे नाव आहे.
याच इमारतीवरुन उडी मारून आत्महत्या केली
हेही वाचा- नाशिक जिल्ह्यातील धरणातून विसर्ग वाढला, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
निकम हे गवंडी काम करत होते. एका इमारतीच्या बांधकामाचे काम त्यांनी घेतले होते. मात्र, अनेक दिवस उलटूनही काम वेळेत पूर्ण होत नसल्याने त्यांना नैराश्य आले. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. अंबड पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. कामाचा तणाव हेच प्रशांत निकम यांच्या मृत्यूचे कारण आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.