नाशिक- जिल्ह्यात शनिवारी काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी संततधार पाऊस झाला. या त्र्यंबकेश्वर, इगतपूरी, पेठ आणि नाशिक या ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे येथील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दुष्काळामुळे नाशिक शहरासह जिल्ह्यात पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले होते्. दरम्यान, त्र्यंबकेश्वरमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरीवर्गामधून समाधान व्यक्त केले जात आहे.
नाशिक जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी, बळीराजा सुखावला.. - nashik
त्र्यंबकेश्वर, इगतपूरी, पेठ आणि नाशिक या ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त केला जात आहे.
त्र्यंबकेश्वरमध्ये पाऊस पडल्यानंतर गोदावरी प्रवाहित होऊन गंगापूर धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस हा इगतपुरीमध्ये झाला असून 24 तासात 170 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ त्र्यंबकेश्वरमध्ये 135 मिलिमीटर, तर पेठमध्ये 105 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सुरगाणा तालुक्यात 104.3 मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला आहे. एकूणच नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.