नाशिक- जिल्ह्यात जोरदार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. नाशिक शहरासह त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि पेठ या ठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे. तर काही ठिकाणी शनिवारी रात्रभर संततधार पाऊस पडत होता.
नाशिकमध्ये मुसळधार पाऊस, शहर जलमय.. 'गोदावरी'च्या पुरात कार गेली वाहून
जिल्ह्यात जोरदार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. पुढील ४ तासात जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.
मुसळधार पावसामुळे त्र्यंबकेश्वरच्या बाजरापेठेमध्ये संपूर्ण पाणी भरले आहे. इगतपुरीत मागील २४ तासांमध्ये सर्वाधिक पाऊस झाला. गेल्या २४ तासात १७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक ठिकाणी पावसामध्ये वाहने अडकून पडली आहेत.
पुढील ४ तासात जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदीला पूर आल्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हा प्रशासन आपत्तीजनक परिस्थितीचा सामना करण्यास सज्ज झाले आहे.