महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदगाव तालुक्यात गारांचा पाऊस; शेतकऱ्यांचे नुकसान - गारा पाऊस नांदगाव

आता कुठेतरी शेतकऱ्यांना कांद्याला भाव मिळून दोन पैसे मिळत असताना आज पडलेल्या पावसाने त्यांच्या स्वप्नावर पाणी फेरले आहे. त्यामुळे शेतकरी आता पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

heavy rain
अवकाळी पाऊस

By

Published : Feb 29, 2020, 7:53 PM IST

Updated : Feb 29, 2020, 10:44 PM IST

नाशिक - नांदगाव शहरासह तालुक्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यावेळी काही ठिकाणी गारांचा पाऊसही पडला. भर उन्हाळ्यात अचानक पाऊस आल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. अचानक आलेल्या पावसामुळे शेतातील कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

नांदगाव तालुक्यात गारांचा पाऊस; शेतकऱ्यांचे नुकसान

आधी अतिवृष्टी झाली आणि आता उन्हाळा सुरू होताच अवकाळी पावसाने हजेरी लावली. याचा फटका शेतकऱयांना बसला असून शेतात उघड्यावर ठेवलेला कांदा आणि मका पूर्ण भिजून खराब झाला आहे. पाऊस येण्याचे वातावरण नसताना अचानकपणे जोरदार वारा सुटून पाऊस सुरू झाला. पावसाचे प्रमाण काही भागात कमी तर काही भागात अतिशय जास्ती होते. तसेच काही ठिकाणी गाराही पडल्या आहेत.

गारांचा पाऊस

दरम्यान, आता कुठेतरी शेतकऱ्यांना कांद्याला भाव मिळून दोन पैसे मिळत असताना आज पडलेल्या पावसाने त्यांच्या स्वप्नावर पाणी फेरले आहे. त्यामुळे शेतकरी आता पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

Last Updated : Feb 29, 2020, 10:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details