नाशिक - जिल्ह्यातील विना अनुदानित शाळा कृती समितीच्यावतीने आज (सोमवारी) शहरात देखील अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये विनाअनुदानित कृती समितीच्या वतीने २० टक्के नाही तर १०० टक्के अनुदान द्या, अशी मागणी करण्यात आली. या मागणीसाठी शिक्षक रस्त्यावर उतरले होते.
नाशिकमध्ये विनाअनुदानित शाळा कृती समितीचे अर्धनग्न आंदोलन - half naked agitation
शहरातील बिटको महाविद्यालय ते नाशिक रोड विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत हे शिक्षक अर्ध निवस्त्र होऊन आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणा करण्यात आल्या. गेल्या काही वर्षांपासून शिक्षकांना अतिशय तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत आहे. त्यामुळे आम्ही काम कसे करावे, हा प्रश्न आता निर्माण झाला आहे, अशी भावनाही या शिक्षकांनी आता व्यक्त केली.

तसेच सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर असेच आंदोलन पुढे सुरु ठेवण्याचा इशाराही शिक्षकांकडून इशाराही यावेळी देण्यात आला.