नाशिक- एक्सप्रेसिव्ह टायोपोग्राफी या भन्नाट कलाकृतीतून मराठी शब्दांना बोलके करण्याचा प्रयत्न प्रसिद्ध अक्षर रचनाकार सुनील धोपावकर यांनी केला आहे. 'हा खेळ अक्षरांचा' या प्रदर्शनीच्या माध्यमातून त्यांनी दोनशेहून अधिक शब्द रेखाटले आहेत. मराठी शब्दांचा अर्थ सहज समजावा यासाठी त्यांनी अनोखे रेखाटण केले आहे.
नाशिकमध्ये 'हा खेळ अक्षरांचा' या प्रदर्शनीचे आयोजन; मराठी शब्द संस्कृतीचे होत आहे दर्शन
शब्दाचे एखादे अंग योग्य प्रमाणात कमी-जास्त करून निर्माण केलेली शब्दांच्या आशयाची चित्र निर्मिती, म्हणजेच मूळ शब्दांचा आशय वाढविण्यासाठी केलेला समतोल वापर याला एक्सप्रेसिव्ह टायोपोग्राफी म्हणतात, असे अक्षर रचनाकार सुनील धोपावकर यांनी यावेळी सांगितले
शब्दाचे एखादे अंग योग्य प्रमाणात कमी-जास्त करून निर्माण केलेली शब्दांच्या आशयाची चित्र निर्मिती, म्हणजेच मूळ शब्दांचा आशय वाढविण्यासाठी केलेला समतोल वापर याला एक्सप्रेसिव्ह टायोपोग्राफी म्हणतात, असे अक्षर रचनाकार सुनील धोपावकर यांनी यावेळी सांगितले. या प्रदर्शनातील गुबगुबीत, डोळे, व्यसन, गणपती, बुद्धिबळ, आई, टेप, झुरळ, दुरुस्ती, पटेल, बेडूक अशी शेकडो अक्षरे लक्ष वेधून घेत होती. विशेष म्हणजे, प्रत्येक अक्षरात वेगळेपण असल्याचे दिसून आले. यावेळी गंगापूर रोड येथील कुसुमाग्रज स्मारकात सुरू असलेले हे प्रदर्शनी बघण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करत आहे. दिनांक 2 जानेवारी पर्यंत नागरिकांसाठी हे प्रदर्शन सुरू राहणार असून या पुढे महाराष्ट्रतील प्रमुख शहारामध्ये प्रदर्शनी भरवण्याचा मानस असल्याचे धोपावकर यांनी सांगितले.