महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिकमध्ये 44 लाखांचा गुटखा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधिक्षक आरती सिंग यांनी जिल्ह्यातील महत्वाच्या मार्गावर गस्त वाढवली आहे. दरम्यान गुजरात राज्यातून महाराष्ट्र हद्दीत पेठ-नाशिक मार्गाने गुटख्याची तस्करी केली जात असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली होती.

44 लाखाचा गुटखा जप्त

By

Published : Sep 28, 2019, 11:06 PM IST

Updated : Sep 28, 2019, 11:37 PM IST

नाशिक- पेठ गोळशी फाटा परिसरात गुजरातकडून नाशिककडे येणाऱ्या टेम्पोमधील 44 लाख 40 हजार रुपये किमतीचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला आहे. पोलिसांनी वाहनासह मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. टेम्पोमधील 40 हजार 800 गुटख्याचे आणि तंबाखुचे पॅकेट पोलिसांनी जप्त केली.

44 लाखाचा गुटखा जप्त

हेही वाचा - नाशकात परराज्यातून बंदुकीची तस्करी करणारे जेरबंद

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधिक्षक आरती सिंग यांनी जिल्ह्यातील महत्वाच्या मार्गावर गस्त वाढवली आहे. दरम्यान गुजरात राज्यातून महाराष्ट्र हद्दीत पेठ-नाशिक मार्गाने गुटख्याची तस्करी केली जात असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे के.के. पाटील, सागर शिंपी यांच्या पथकाने गुजरात राज्यातुन येणारा संशयीत टेंम्पो (आयशर क्र. एचएच-02-ईआर-5010) ची तपासणी केली.

त्यावेळी त्यामध्ये गोण्यांमध्ये भरलेला विमल पानमसाला आढळून आला. वाहनासह मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलीस निरक्षक संजय पाटील, राजू दिवटे, प्रकाश तुपलोंढे, दिपक आहिरे, हनुमंत महाले, पुंडलीक राऊत, दत्तात्रय साबळे, या गस्तीपथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा - कारवाईचा लाभ घेणे हे पवारांचे राजकारण - भांडारी

Last Updated : Sep 28, 2019, 11:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details