महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिकच्या धरणात केवळ 45 टक्के पाणीसाठा; पालकमंत्री भुजबळांनी दिले पाणी कपातीचे संकेत - नाशिक पालकमंत्री बातमी

नाशिक जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील इगतपूरी येथील धरण वगळता उर्वरीत धरणांत 25 ते 45 टक्के पाणीसाठी शिल्लक आहे. यामुळे योग्य नियोजन करण्याच्या सुचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे नाशिककरांवर पाणी कपातीची टांगती तलवार आहे.

file photo
file photo

By

Published : Aug 8, 2020, 4:27 PM IST

नाशिक- ऑगस्ट महिन्याची 8 तारीख आली असून अद्याप नाशिक जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने मागील वर्षीच्या तुलनेत नाशिक जिल्ह्यातील धरणात अत्यल्प पाणी साठा शिल्लक आहे. पुढील काही दिवसात समाधानकारक पाऊस झाला नाही तर नाशिककरांवर पाणी कपातीचे संकट येऊ शकते, असे संकेत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत.

जून, जुलै महिना उलटून गेला असून नाशिक जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस झाला नसल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात सद्य स्थितीत केवळ 45 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. इगतपुरी तालुका वगळता इतर तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने इतर धरणात 25 ते 45 टक्के इतकाच पाणी साठा शिल्लक आहे. येत्या दिड-दोन महिन्यात होणाऱ्या पावसावर धरणातील पाणीसाठ्याची वाढ अवलंबून असल्याने आत्ता पासूनच पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. तसे याचा कोणीही राजकारण करू नये, असे आवाहनही मंत्री भुजबळ यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details