नाशिक- भारतीय परंपरेतील वटपौर्णिमा हा महत्त्वाचा सण आज सर्वत्र साजरा होत आहे. सर्व सुवासिनी स्त्रिया आजच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करून हा सण साजरा करतात. मात्र, नाशिकमधील 'ग्रीन रिव्होल्यूशन' या संस्थेने 150 वटवृक्ष लावून वटपौर्णिमा साजरी केली आहे. त्यामुळे त्यांच्या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.
कौतुकास्पद..! 'ग्रीन रिव्होल्यूशन'ने 150 वटवृक्षांची लागवड करुन साजरी केली वटपौर्णिमा
नाशिकमधील 'ग्रीन रिव्होल्यूशन' या संस्थेने 150 वटवृक्ष लावून वटपौर्णिमा साजरी केली आहे.
वटपौर्णिमा हा सण स्त्रियांसाठी जिव्हाळ्याचा असला तरी पर्यावरणप्रेमींसाठी मन विषण्ण करणारा अनुभव असतो. पौर्णिमेनंतर शहरी भागात 2-3 दिवस रस्त्यावर वडाच्या फांद्या पायदळी तुडवल्या जातात. त्यामुळे धार्मिक महत्त्व असलेल्या वृक्षाच्या फांद्या न तोडता या वृक्षाची लागवड करावी, यासाठी ग्रीन रिव्होल्यूशनच्या वतीने 150 वटवृक्षांची लागवड करण्यात आली.
ग्रीन रिव्होल्यूशन टिमने मागील वर्षी 51 वटवृक्ष लावून वर्षभर त्याचे संगोपन केले आहे. तसेच यावर्षीही त्यांनी वटवृक्षांची लागवड केली आहे. यावेळी पुरुष, महिला, लहान मुलींनी सहभाग नोंदविला.