महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Goldan Modak In Nashik : नाशकात बाप्पांच्या नैवेद्यासाठी 16 हजार रुपये किलोचे गोल्डन मोदक

Goldan Modak In Nashik : गणपती बाप्पांना प्रिय असलेल्या मोदकाचे अनेक (Ganesh Festival Nashik) प्रकार बाजारात उपलब्ध झाले आहेत. (Offering to Ganesh) नाशिकमध्ये बाप्पाच्या नैवेद्यासाठी चक्क 24 कॅरेट सोन्याचा वर्ख असलेले गोल्डन मोदक सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. 16 हजार रुपये किलो दराने हे मोदक बाजारात उपलब्ध आहेत. (Modak with Gold Leaf)

Goldan Modak In Nashik
गोल्डन मोदक

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 21, 2023, 6:35 PM IST

Updated : Sep 21, 2023, 6:45 PM IST

विविध फ्लेवरच्या मोदकांविषयी सांगताना दुकानदार आणि ग्राहक

नाशिकGoldan Modak In Nashik : राज्यासह नाशिक जिल्ह्यामध्ये गणेशोत्सवाची धूम दिसून येत आहे. मंगळवारी लाडक्या गणरायाचं घरोघरी आगमन झालं. (Ganesh Festival Nashik) आता घरोघरी वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य करून बाप्पांचे लाड पुरवले जात आहेत. अशात बाप्पांना प्रिय असणारे विविध फ्लेवरचे मोदक बाजारात उपलब्ध झाले आहेत. (Offering to Ganesh) यात यंदा 24 कॅरेट सोन्याचा वर्ख असलेले गोल्डन मोदक सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. 16 हजार रुपये किलो दराने मिळणाऱ्या या मोदकांना भाविकांची पसंती मिळत आहे. (Modak with Gold Leaf) त्यासोबतच चांदीचा वर्ख असलेले सिल्व्हर मोदक देखील 1600 रुपये किलोने बाजारात उपलब्ध आहेत.

विविध फ्लेवर मधील मोदक:सोन्या, चांदीचा वर्ख असलेल्या मोदकांसोबतच बच्चे कंपनीची आवड लक्षात घेता बटरस्कॉच, चॉकलेट, मॅंगो या फ्लेवरचे मोदक, सुक्या मेव्याचा वापर करत तयार केलेला एक किलोचा एकच मोदक, काजू कतली मोदक, केशर मोदक, मलाई मोदक, मोतीचूर मोदक, पक्का मोदक असे विविध प्रकारचे मोदक बाजारात दाखल झाले आहेत. काही दुकानांमध्ये खव्याचे आणि पुरणाचे मोदकही खरेदीस उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यांच्या मागणीलाही ग्राहकांकडून प्रतिसाद मिळत आहे.


मोदकांच्या किमती:गोल्डन मोदक -16 हजार रुपये किलो
सिल्वर मोदक -1600 रुपये किलो
फ्रोजन मोदक - 35 रुपये नग
काजू मोदक - 1200 रुपये किलो
अंजीर मोदक- 1000 ते 1200 रुपये किलो
पक्का मोदक -600 रुपये किलो
खोबऱ्याचे मोदक -650 रुपये किलो


उकडीचे फ्रोजन मोदक :गणेशोत्सवात भाविकांकडून उकडीच्या मोदकांना विशेष मागणी असते. त्यामुळे यंदा खास उकडीचे फ्रोजन सिल्वर मोदक बाजारात आले आहेत. हे मोदक सहा महिन्यांपर्यंत टिकू शकतात हे त्याचं वैशिष्ट्य आहे. या उकडीच्या मोदकांनाही ग्राहकांची मोठी मागणी असल्याचं मिठाई विक्रेते सांगतात.


सोन्या-चांदीच्या वर्खचे आकर्षण :यंदा सोन्या-चांदीचा वर्ख असलेल्या मोदकांना भाविकांची मोठी पसंती मिळत आहे. आम्ही आतापर्यंत अनेक किलो मोदक विकले आहेत. विविध फ्लेवरच्या मोदकांनाही ग्राहकांची मागणी आहे. बच्चे कंपनीसाठी तयार केलेल्या चॉकलेट आणि बटरस्कॉच मोदकांनाही पसंती मिळत असल्याचं सागर स्वीटचे संचालक दीपक चौधरी यांनी सांगितलं.

हेही वाचा:

  1. Ganesh Festival 2023 : मुख्यमंत्र्यांच्या घरच्या दीड दिवसाच्या बाप्पांचं विसर्जन, पत्नीने वाजवला ढोल; पहा व्हिडिओ
  2. Ganesh Festival २०२३ : चित्रकारानं पर्यावरण बचाव देखावा साकारत गणरायाला घातलं 'हे' साकडं; पाहा व्हिडिओ
  3. Ganesh Festival 2023: लालबागमधील पर्यावरणाचा राजा पाहण्यासाठी भाविकांच्या लागल्या रांगा, पाहा व्हिडिओ
Last Updated : Sep 21, 2023, 6:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details