नाशिक- गंगापूरच्या एका २० वर्षीय तरुणीने शिवाजी केदारे या व्यक्तीकडून लग्नासाठी होत असलेल्या 'ब्लॅकमेलिंग'ला कंटाळून गोदावरी नदीत उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रोशनी हिरे असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी मृत तरुणीच्या आईने गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे.
मृत रोशनी हिच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, शिवाजी केदारे (वय ३८) हा व्यक्ती मागील काही दिवसांपासून रोशनीला आपल्याशी लग्न करण्यासाठी वारंवार त्रास देत होता. त्याने रोशनीच्या काही फोटो काढले होते. त्या फोटोचा आधार घेऊन तो तिला लग्नासाठी 'ब्लॅकमेल' करत होता. महत्वाचे म्हणजे, रोशनीचा विवाह या महिन्याच्या २० तारखेला होणार होता.