गिरीश महाजनांची किसान सभेच्या नेत्यांसोबत बैठक, लाँग मार्च थांबणार?
किसान सभेने मागील वर्षी मंत्रालयावर काढलेल्या पायी मोर्चानंतर शासनाने दिलेल्या आश्वासनाची वर्षभरात पूर्तता न झाल्याने किसान सभेने पुन्हा एकदा पायी मोर्चाचे शस्त्र उगारले आहे.
नाशिक - किसान सभेच्या नेत्यांसोबत जिल्ह्यातील वाडीव्हरे गावात मंत्री गिरीश महाजन आणि जयकुमार रावल यांनी बैठक घेतली. बैठक सकारात्मक पार पडली असून जवळपास सर्व मुद्दयांवर सरकार आणि आंदोलकांची सहमती झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे किसान सभेचे लाँग मार्च आंदोलन स्थगित होण्याची शक्यता आहे.
किसान सभेने मागील वर्षी मंत्रालयावर काढलेल्या पायी मोर्चानंतर शासनाने दिलेल्या आश्वासनाची वर्षभरात पूर्तता न झाल्याने किसान सभेने पुन्हा एकदा पायी मोर्चाचे शस्त्र उगारले आहे. हजारो आदिवासी शेतकऱ्याचा लाँग मार्च मुंबईकडे कूच झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आज बैठक घेण्यात आली. यामध्ये सरकारच्यावतीने गिरीश महाजन, जयकुमार रावळ, तर किसान सभेच्या वतीने आमदार जे. पी. गावीत, डॉ. अशोक ढवळे आणि डॉ. अजित नवले उपस्थित होते.