नाशिक - जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील चिचलीबार येथे २ हजार १५० जिलेटीनच्या कांड्या आणि १ हजार ७५० डिटोनेटरचा साठा जप्त करण्यात आला. तसेच ३ लाख रुपयांची पिकअप गाडीही ताब्यात घेण्यात आली. जायखेडा पोलिसांनी ही कारवाई केली असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. भवरलाल शंभुलाल गुंजर (वय २५) आणि बुदललाल तुलसिराम गुंजर असे आरोपींची नावे आहेत.
२ हजार जिलेटीनच्या कांड्यांसह डिटोनेटरचा साठा जप्त - जिलेटीन
जायखेडा पोलीस मध्यरात्रीच्या सुमारास गुजरातच्या हद्दीवर गस्त घालत होते. यावेळी संशय आल्याने त्यांनी गुजरातकडे जाणाऱ्या पिकअप गाडीची तपासणी केली. त्यामध्ये जिलेटीन आणि डिटोनेटरचा साठा आढळून आला.
अटक केलेला आरोपी
जायखेडा पोलीस मध्यरात्रीच्या सुमारास गुजरातच्या हद्दीवर गस्त घालत होते. यावेळी संशय आल्याने त्यांनी गुजरातकडे जाणाऱ्या पिकअप गाडीची तपासणी केली. त्यामध्ये जिलेटीन आणि डिटोनेटरचा साठा आढळून आला. त्यापैकी एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले, तर एक आरोपी फरार झाला. जायखेडा पोलीस त्याचा शोध घेत असून पुढील चौकशी करीत आहेत.