महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मित्रानेच पेटवले मित्राच्या बायकोला, नाशिकमधील धक्कादायक प्रकार - ignited

नाशिकच्या पंचवटी परिसरात एका राहत्या घरात एक महिला जळालेल्या अवस्थेत तर पुरुष विष प्राशन केलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे

मित्रानेच मित्राच्या पत्नीला जाळले

By

Published : Mar 31, 2019, 3:03 PM IST

नाशिक- पंचवटीतील कृष्णानगरमधील हरीसिद्धी इमारतीतील एका फ्लॅटमध्ये जळीतकांड घडले आहे. मित्रानेच मित्राच्या बायकोला अंगावर पेट्रोल टाकून जाळले आहे. आज सकाळी सात वाजताच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकच्या पंचवटी परिसरात एका राहत्या घरात एक महिला जळालेल्या अवस्थेत तर पुरुष विष प्राशन केलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विष प्राशन केलेल्या पुरुषानेच या महिलेला जाळल्याचा संशय आहे.

रेखा बाळू मोरे (वय 34) असे या महिलेचे नाव आहे. रेखा बाळू मोरे, तिचा नवरा बाळु जगन्‍नाथ मोरे, नवऱ्याचा मित्र रवींद्र नाना भामरे, बाळू मोरे यांची मुलगी सायली हे गेल्या १३ वर्षांपासून एकत्र एका फ्लॅटमध्ये राहत होते. दोन महिन्यांपासून त्यांच्यामध्ये भांडण सुरू होते. रेखा बाळू मोरे ही रवींद्र भामरे यांना सांगत होती की, तू तुझं लग्न करून येथून निघून जा, इथे राहू नको. आज सकाळी देखील याच विषयावरून त्यांच्यात भांडण झाले होते. याच वादातून रवींद्र नाना भामरे यांनी रेखा मोरे यांच्यावर पेट्रोल टाकून जाळून टाकले असल्याचे म्हटले जात आहे.

मित्रानेच मित्राच्या पत्नीला जाळले

आज पहाटे पाच वाजता बाळू मोरे हे कामावर जाताना रवींद्रने रेखाला पेट्रोल टाकून पेटवून दिले आणि स्वतः देखील विषारी औषध सेवन केले. याप्रकरणी नाशिक पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान या घटनेत रेखा बाळू मोरे ८० टक्के जळाली आहे आणि रवींद्र नाना भामरे गंभीर जखमी आहेत. याप्रकरणी नाशिक पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे


For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details