नाशिक- देशातील महिला सशक्त तर कुटुंब सशक्त असे म्हटले जाते, मात्र गेल्या काही वर्षापासून महिलांमध्ये थायरॉईडचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. काही महिलांना या आजाराचे उपचार खासगी रुग्णालयात घेणे शक्य नसते. त्यामुळे मतदान करा, शाई लावलेले बोट दाखवा आणि थायरॉईडची तपासणी मोफत करण्याचा अनोखा उपक्रम क्रस्ना डायगोनिस्ट संस्थेकडून नाशिकमध्ये राबवण्यात येणार आहे.
'मतदान करा, थायरॉईडची मोफत तपासणी करा'; नाशकात महिलांसाठी अनोखा उपक्रम
याबाबत क्रस्ना डायगोनिस्ट संस्थेकडून अनोखा उपक्रम रावबला जात आहे. यात महिलांनी मतदान केल्याचे बोट दाखवल्यानंतर त्यांचीं थायरॉईडची तपासणी मोफत केली जाणार आहे.
एका सर्व्हेनुसार १ हजार महिलांमागे ८० महिलांना थायरॉईड झाल्याचे समोर आले आहे. अनेकवेळा महिला भीतीमुळे थायरॉईडची तपासणी करत नाही, तर खासगी रुग्णालयात ही तपासणी करणे अनेक महिलांना परवडत नसल्याने हा आजार बळावत असल्याचे दिसून आले आहे. आधी थायरॉईड हा आजार महिलांमध्ये वयाच्या ३५ वर्षानंतर दिसत होता मात्र आता १५ ते २० वर्षातील मुलींमध्ये थायरॉईडचे प्रमाण वाढले आहे.
याबाबत क्रस्ना डायगोनिस्ट संस्थेकडून अनोखा उपक्रम रावबला जात आहे. यात महिलांनी मतदान केल्याचे बोट दाखवल्यानंतर त्यांचीं थायरॉईडची तपासणी मोफत केली जाणार आहे. यासाठी नाशिकच्या इंदिरानगर, द्वारका, पेठरोड, पंचवटी, नाशिक रोड भागात सेंटर सुरू करण्यात आले आहेत. या संस्थेचे काम १५ राज्यातील २ हजार ५०० ठिकाणी केले जाते. मतदान करा आणि थायरॉईडची मोफत तपासणी करा, असे आवाहन संस्थेने केले आहे.