महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मनमाडला कोरोनाचा कहर; शहरात आढळले 15 नवीन कोरोनाबाधित, एकूण आकडा 83 - मनमाड शहरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढली

शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात येत असताना शहरात नवे 15 रुग्ण आढळून आले आहेत. 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू देखील झाला आहे. या घटनेमुळे प्रशासन आणि नागरिकांची चिंता वाढली आहे.

manmad
मनमाड नगर परिषद

By

Published : Jul 4, 2020, 5:01 PM IST

Updated : Jul 4, 2020, 10:55 PM IST

मनमाड- कोरोनामुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या मनमाड शहरात 15 नवे रुग्ण आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 3 जणांचा शहरात मृत्यू झाल्याने नागरिक धास्तावले आहेत. शहरातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 83 झाली आहे. तर यापैकी 50 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 30 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.

मनमाडला कोरोनाचा कहर; शहरात आढळले 15 नवीन कोरोनाबाधित, एकूण आकडा 83

मनमाड शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आलेली असताना शहरात नवे 15 रुग्ण आढळून आले आहेत. 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू देखील झाला आहे. या घटनेमुळे प्रशासन आणि नागरिकांची चिंता वाढली आहे. सध्या शहरातील कोरोना सेंटरमध्ये 30 जणांवर उपचार सुरू आहेत. एकूण 50 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

शहरातील कोरोनाने दगावलेल्या नागरिकांच्या घरातील जवळपास 30 जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यातील हे नवीन 15 रुग्ण असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. प्रशासन एवढी काळजी घेत असताना नागररिक हलगर्जीपणा करत आहेत. अनेक ठिकाणी विनाकारण गर्दी करणे, काम नसताना गावात फिरणे, मास्क न वापरणे, यामुळे देखील संसर्ग वाढत आहे. आता पावसाळ्याच्या दिवसात नव्याने रुग्ण वाढण्याची शक्यता देखील डॉक्टरांनी बोलून दाखवली आहे.

शहरातील दुकाने सम विषम पद्धतीने सुरू आहेत. मृत झालेल्या नागरिकांच्या शेजारील परिसरात औषध फवारणी करून तेथे कंटेनमेंट झोन करण्यात आले आहेत. तेथील नागरिकांना घरपोच जीवनावश्यक वस्तू पुरविण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. ही साखळी तुटावी म्हणून सायंकाळी 5 नंतर संचारबंदी देखील लावण्यात आलेली आहे. तरीही नागरिकांनी जागरूक राहून काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेणकर यांनी केले आहे.

मनमाड कोरोना अपडेट

रुग्ण संख्या - 83

मृत्यू - 03

कोरोना मुक्त - 50

अॅक्टिव्ह रुग्ण - 30

Last Updated : Jul 4, 2020, 10:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details