महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बिबट्याच्या बछड्यासोबतच्या सेल्फीप्रकरणी कारवाईचे वनविभागाचे संकेत

नाशिकच्या वन विभागाने ही बाब गांभीर्याने घेत ऊसतोड कामगारांची चौकशी करून कारवाई करण्याचे संकेत दिली आहेत.

nashik
nashik

By

Published : Feb 3, 2021, 5:27 PM IST

Updated : Feb 3, 2021, 5:33 PM IST

नाशिक -निफाड तालुक्यातील ऊसाच्या शेतात मिळून आलेल्या बिबट्याच्या बछड्यासोबत जीवावर उदार होत ऊसतोड कामगारांनी सेल्फी काढत व्हिडिओ व्हायरल केल्याची घटना घडली. नाशिकच्या वन विभागाने ही बाब गांभीर्याने घेत ऊसतोड कामगारांची चौकशी करून कारवाई करण्याचे संकेत दिली आहेत.

चौकशी होणार

या भागात बिबट्याला लपण्यासाठी जागा असल्याने मोठ्या प्रमाणत बिबट्यांचे वास्तव्य आहे. 2 फेब्रुवारी रोजी कुरुड गाव शिवारातील एका शेतात ऊसतोड सुरू असताना कामगारांच्या मुलांना बिबट्याचे बछडे मिळून आले. यावेळी त्यांनी 4 ते 6 महिन्यांच्या बछड्यांना उचलून घेत जीवाची परवा न करता चक्क त्याच्यासोबत सेल्फी काढले. एवढ्यावरच न थांबता हे व्हिडिओ व्हायरल केले. यादरम्यान बिबट्याच्या मादीने हल्ला केला असता तर अनर्थ झाला असता. वनविभागाने ही बाब गांभीर्याने घेत ऊसतोड कामगारांची चौकशी करून कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

'वन प्राण्यांना हाताळणे गुन्हा'

बिबट्याचा बछडा हाताळणे हा कायदेशीर गुन्हा आहे. निफाड तालुक्यातील बिबट्यासोबतच्या सेल्फीची घटना धक्कादायक आहे. ज्या मुलांनी या बछड्याला उचलले, तो बछडा 4 ते 6 महिन्याचा होता, त्यानेदेखील हल्ला केला असता. तसेच बिबट्याची मादी जवळ असती तर तिनेदेखील हल्ला केला असता. ही बाब आम्ही गांभीर्याने घेऊन चौकशी करून कारवाई करू. जीवाची परवा न करता नागरिकांनी असे साहसी प्रकार करू नयेत. बिबट्या बरोबरच सापाला हाताळणे, त्याला दूध पाजणे, अंगाखांद्यावर खेळवणे हादेखील गुन्हा आहे. याबाबत नागरिकांनी जागरूक राहण्याची गरज आहे, असे वनविभागाने सांगितले आहे.

Last Updated : Feb 3, 2021, 5:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details