महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिंडोरी मतदारसंघातील नागापुरात ढोल ताशांच्या गजरात मतदान, तरुणांनी मतदानाचा केला उत्सव

मतदान करणे हा लोकशाहीने दिलेला आपला अधिकार आहे. तसेच, हे प्रत्येक सजग नागरिकाचे कर्तव्य देखील आहे. आपल्या मताने आपला लोकप्रतिनिधी कोण असणार हे ठरणार असते. नागापूर येथील नवतमदारांनी मतादानाचा उत्सव साजरा करण्याचे ठरवले.

तरुणांनी ढोल ताशाच्या गजरात मतदान केले

By

Published : Apr 29, 2019, 12:00 PM IST

नाशिक - दिंडोरी मतदारसंघातल्या मतदारांनी मतदानाचा उत्सव साजरा केला आहे. नांदगाव तालुक्यातील नागापुरातील तरुणांनी ढोल ताशांच्या गजरात मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले.

तरुणांनी ढोल ताशाच्या गजरात मतदान केले

मतदान करणे हा लोकशाहीने दिलेला आपला अधिकार आहे. तसेच, हे प्रत्येक सजग नागरिकाचे कर्तव्य देखील आहे. आपल्या मताने आपला लोकप्रतिनिधी कोण असणार हे ठरणार असते. नागापूर येथील नवतमदारांनी मतादानाचा उत्सव साजरा करण्याचे ठरवले.

ढोल ताशाचा गजर करत येथील ६० तरुण मतदान केंद्रावर गेले . आम्ही पहिल्यांदाच मतदान करत असल्याने आम्हाला आनंद होत आहे. देशाच्या घटनेने आम्हाला मतदानाचा हक्क दिला आहे. हा आनंद व्यक्त करण्यासाठी आम्ही ढोल ताशाच्या गजरात मतदान केले, अशी भावना तरुणांनी व्यक्त केली.

ABOUT THE AUTHOR

...view details