महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वसंत कानेटकरांना मानवंदना..! "अश्रूंची झाली फुले" नाटकाचा पहिला प्रयोग नाशिकमध्ये - pune

या नाटकाचे महाराष्ट्रभर ५१ प्रयोग होणार असून मुंबई पुण्यापाठोपाठ नाशिक जिल्ह्यात सर्वत्र हे नाटक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू असा विश्वास सुबोध भावे यांनी व्यक्त केला.

वसंत कानेटकरांना मानवंदना..!

By

Published : May 2, 2019, 10:48 AM IST

नाशिक- लेखक वसंत कानेटकर यांना मानवंदना देण्यासाठी "अश्रूंची झाली फुले" या नाटकाचा पहिला प्रयोग नाशिकमध्ये घेतल्याचे कलाकार सुबोध भावे यांनी सांगितले. नाशिकच्या कालिदास कला मंदिरात झालेल्या या नाटकाला प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. या नाटकाचे लेखक वसंत कानेटकर यांनी नाटकाची अतिशय छान कलाकृती केल्यानं आम्ही त्याचं चांगल्या पद्धतीने सादरीकरण करू शकल्याचे सुबोध भावेने म्हटले.

नाटकाच्या सुरुवातीपासूनच प्रेक्षकांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून आम्हाला प्रतिसाद दिला, त्यामुळे आम्हालाही एनर्जी मिळाल्याचं सुबोध यांनी सांगितले. या आधी काशीनाथ घाणेकर आणि रमेश भाटकर यांनी केलेलं "अश्रूंची झाली फुले" हे नाटक कधीच पाहिलं नव्हतं. त्यामुळे हे नाटक करणं नवीन असल्याचे सुबोध भावेने सांगितले.

वसंत कानेटकरांना मानवंदना..!

या नाटकाचे महाराष्ट्रभर ५१ प्रयोग होणार असून मुंबई पुण्यापाठोपाठ नाशिक जिल्ह्यात सर्वत्र हे नाटक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू असा विश्वास सुबोध भावे यांनी व्यक्त केला. या नाटकाचे दिग्दर्शन प्रतिमा कुलकर्णी यांनी केले आहे तर निर्मिती दिनेश पेडणेकर, मंजिरा भावे, राहुल कर्णिक, अभिजीत देशपांडे यांनी केली आहे. यात सुबोध भावेशिवाय शैलेश दातार, सीमा देशमुख, उमेश जगताप, प्रणव जोशी, रवींद्र कुलकर्णी,जितेंद्र आगरकर, प्रथमेश देशपांडे,भूषण गमरे, रोहित मोरे रोहित मोरे, श्रद्धा पोखरणकर या कलाकारांनीही भूमिका साकारल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details