नाशिक - फटाके फोडल्यामुळे निर्माण होणारा धूर हा कोरोना रुग्णांच्या आरोग्यासाठी हानीकारक आहे. त्यामुळे यावर्षी कमीतकमी फटाके फोडावे, असे आवाहन राज्याचे अन्न नागरी पुरवठामंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. ते नाशिक येथे पत्रकारांशी बोलत होते.
दिवाळीवर कोरोनाचे सावट
दरवर्षी दिवाळीत विविध प्रकारचे फटाके फोडण्यासाठी नागरिक खूप उत्साही असतात. मात्र यंदा हा सण देखील इतर सणांप्रमाणे कोरोनाच्या सावटाखाली साजरा होणार आहे.
फटाक्यांचा धूर श्वास घेण्यासाठी त्रासदायक
फटाक्यांमुळे निर्माण होणारा धूर हा श्वास घेण्यासाठी त्रासदायक आहे. त्यामुळे फटाके फोडणे कोरोना रुग्णांसाठी अधिक त्रासदायक ठरणार असल्याने नागरिकांनी यावर्षी कमीत कमी फटाके फोडावे अथवा फटाके फोडू नये, असे आवाहन नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
फटाक्यांवर बंदी नाही, मात्र
दरवर्षी दिवाळीनिमित्त मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी केली जाते. मात्र यावर्षी राज्यावर उद्भवलेली कोरोना परिस्थिती पाहता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील यंदा दिवाळी फटाकेमुक्त साजरी करा, असं आवाहन केल आहे.
हेही वाचा-आठ वर्षापूर्वी माथाडी कामगाराचा झाला होता खुन, आत्ता झाला उलगडा
हेही वाचा-पैशांवर खेळल्या जाणाऱ्या ऑनलाईन गेम्सना तामिळनाडूमध्ये बंदी