येवला (नाशिक) - तालुक्यातील कोळगाव येथील माळवाडी येथे राहणारे बबन देवराम कमोदकर यांच्या शेतातील चारा व मक्याच्या बिट्या आग लागून जळून खाक झाल्या आहेत. आगीत या शेतकऱ्याचे जवळपास दहा ट्रॉली मक्याचा चारा, दहा ट्रॉली मक्याच्या बिट्या, दहा ट्रॉली बाजरी चारा, तसेच मठाचे व बाजरीचे भूस जळून खाक झाले असल्याने लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. या बाबतचा नुकसानीचा पंचनामा तलाठ्याकडून करण्यात आला असून तो अहवाल वरीष्ठाकडे पाठविला आहे.
येवल्यातील माळवाडी येथे चारा व मक्याच्या बिट्या जळून खाक..!
आगीत या शेतकऱ्याचे जवळपास दहा ट्रॉली मक्याचा चारा, दहा ट्रॉली मक्याच्या बिट्या, दहा ट्रॉली बाजरी चारा, तसेच मठाचे व बाजरीचे भूस जळून खाक झाले असल्याने लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे.
येवला
या आगीची माहिती मिळताच येवला येथील अग्निशामक बंबाची गाडी घटनास्थळी तत्काळ दाखल झाली. मात्र, त्यांनीही आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र तो पर्यंत चारा जळून खाक झाला होता.