मनमाड(नाशिक)-मनमाड जवळ असलेल्या अंकाई किल्याला बुधवारी सायंकाळी अचानकपणे आग लागली. आग इतकी भीषण होती की संपूर्ण डोंगरावर आग पसरली आणि डोंगरावर असलेली औषधी वनस्पती यासह झाडे जळून खाक झाली. अंकाई आणि अनकवाडे गावातील नागरिक व मनमाड येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.
मनमाडच्या अंकाई किल्ल्याला आग अनेक औषधी वनस्पती जळून खाक - येवला रोड
मनमाडच्या जवळ डोंगरांच्या मोठमोठ्या रांगा आहेत यातील येवला रोडवर अंकाई-टंकाई हे जोडगळी किल्ले आहेत. बुधवारी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या दरम्यान या डोंगररांगातील अंकाई या किल्ल्याला अचानकपणे आग लागली.
मनमाडच्या जवळ डोंगरांच्या मोठमोठ्या रांगा आहेत यातील येवला रोडवर अंकाई-टंकाई हे जोडगळी किल्ले आहेत. या ठिकाणी अनेक पुरातन गुहा तसेच लेणी आहेत. पर्यटकांसह जिल्ह्यातील अनेक गिर्यारोहक येथे ट्रेकिंग करण्यासाठी येत असतात. बुधवारी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या दरम्यान या डोंगररांगातील अंकाई या किल्ल्याला अचानकपणे आग लागली. आग इतकी भीषण होती की या जवळपास संपूर्ण डोंगरच आगीच्या भक्ष्यस्थानी अनेक औषधी वनस्पती व झाडे जळून खाक झाली.
अंकाई आणि अनकवाडे या गावातील ग्रामस्थ यांनी मिळून आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. मनमाड नगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी देखील प्रयत्न केले. आग एवढी भयानक होती की काही मिनिटांतच संपूर्ण डोंगराला आगीचा विळखा बसला.