महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शाळेचा पहिला दिवस..! नाशिकच्या प्रबोधिनी शाळेत विशेष विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

नाशिकच्या प्रबोधिनी शाळेत आज पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. या विशेष मुलांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून त्याचे स्वागत करण्यात आले.

प्रबोधिनी शाळेत आजच्या पहिल्या दिवशी मुलांच्या हस्ते आकाशात फुंगे सोडून त्यांचे स्वागत करण्यात आले.

By

Published : Jun 17, 2019, 6:49 PM IST

नाशिक- मानसिक दृष्ट्या अपंग विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या नाशिकच्या प्रबोधिनी शाळेत आज पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. या विशेष मुलांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून त्याचे स्वागत करण्यात आले. यावेळी शिक्षकांनी त्यांच्यासाठी गाणेही गायले. प्रबोधिनी शाळेने आतापर्यंत २५ मानसिक दृष्ट्या अपंग मुलांना शिक्षण देऊन त्यांचे पुनर्वसन केले आहे.

प्रबोधिनी ट्रस्ट संचलित प्रबोधिनी विद्यामंदिर ही शाळा गेल्या ४२ वर्षांपासून मानसिक अपंग मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत आहे. या शाळेत आज साडेतीनशेहून अधिक विशेष मुलांना शिक्षण दिले जाते. ७ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढवून त्यांना स्वावलंबी बनवण्यावर भर दिला जातो. तसेच यातील तीस विद्यार्थी आज नामांकित कंपनीमध्ये किमान वेतनावर काम करत आहे.

मुख्यधापक रमेश वणीस यांची प्रतिक्रिया

विशेष विद्यार्थ्यांचे गुण ओळखून शाळतून त्यांना चालना देण्यात येते. पुस्तकी अभ्यासा सोबत विद्यार्थ्यांचा कल ओळखून त्यांना राज्य आणि क्रीडा स्पर्धेत सहभागी केले जाते. सांस्कृतिक विभागा मार्फत घेण्यात येणाऱ्या नाट्य विभागातील स्पर्धेत गेल्या तीन वर्षापासून या शाळेतली विद्यार्थी प्रथम क्रमांक पटकवत आहेत. विद्यार्थ्यांना शाळेमध्ये फिजिओथेरपी तसेच वर्तन समस्या बाबत मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार केले जातात. तसेच शहरा बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी या शाळेत वसतिगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. २०१५-१६ या काळात शासनाच्या फुले-शाहू-आंबेडकर हा पंधरा लाखाचा पुरस्कार शाळेला मिळाला आहे.

आज झालेल्या कार्यक्रमाला शाळेच्या अध्यक्ष सुलभा सरोटे, पूनम यादव ,मनीषा नलगे, मनीषा अवचल, मिलिंद मुंद यांच्यासह मुख्याध्यापक रमेश वणीस उपस्थित होते. यावेळी WOW ग्रुपच्या महिलांनी या विशेष मुलांना फुले आणि खाऊ देत त्यांचे पहिल्या दिवशी शाळेत स्वागत केले.

ABOUT THE AUTHOR

...view details