नाशिक - येवला तालुक्यातील कुसमाडी गावात जन्मदात्या वडिलांनीच आपल्या मुलाचा दोरीने गळा आवळून खून केल्याची घटना घडली. गोकुळ आहिरे असे 24 वर्षीय मृत मुलाचे तर
गोपीनाथ आहिरे असे आरोपी पित्याचे नाव आहे.
येवल्यातील कुसमाडी गावात कौटुंबिक वादातून मुलाचा खून, वडिलास अटक - नाशिकमध्ये वडिलांकडून मुलाचा खून
नेहमीच्या त्रासाला कंटाळून जन्मदात्या बापानेच घरातील दोरी घेऊन व्यसनाधीन मुलाचा गळा आवळून खून केला. या घटनेची माहिती गावाचे पोलीस पाटील यांनी येवला ग्रामिण पोलीस स्टेशनला कळवली. त्यानंतर पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
या घटनेविषयी पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, की व्यसनाधीन मुलगा हा नेहमी दारू पिऊन आल्यानंतर सर्व कुटुंबाला त्रास देत होता. नेहमीच मुलगा कौटुंबिक वाद करत होता. अखेर या नेहमीच्या त्रासाला कंटाळून जन्मदात्या बापानेच घरातील दोरी घेऊन व्यसनाधीन मुलाचा गळा आवळून खून केला. या घटनेची माहिती गावाचे पोलीस पाटील यांनी येवला ग्रामिण पोलीस स्टेशनला कळवली.त्यानंतर पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. यावेळी मृत मुलाचे वडिल गोपीनाथ आहिरे यांनी मी हा गुन्हा केला आहे, असा कबुली जबाब पोलिसांना दिला. त्यानंतर आरोपी पित्यास खुनाच्या गुन्ह्याखाली पोलिसांनी अटक केली असून सदर घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.