नाशिक -शेतात काम करत असताना अंगावर वीज पडून एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. चांदवड तालुक्यातील सोनसांगवी गावातील ही घटना असून रंगनाथ ठाकरे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू; चांदवडजवळील सोनसांगवी येथील घटना - वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू
अंगावर वीज पडून एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. चांदवड तालुक्यातील सोनसांगवी गावातही घटना घडली.
सध्या नाशिक जिल्ह्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. काल दिवसभरात जिल्ह्यात 140 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यात नाशिकच्या ग्रामीण भागात विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह होत असलेल्या पावसाने मनमाड, नांदगाव, निफाड पाठोपाठ चांदवड, बागलाण, सिन्नर, कळवणला तडाखा बसला. कित्येक तासापासून सलग होत असलेल्या पावसाने जिल्ह्यातील अनेक भागात शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सर्वत्र शेतात पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे मका, बाजरी, कांदे, कापूस यासह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले.
नाशिक जिल्ह्यातील शेतकरी नेहमीच नैसर्गीक संकटांनी घेरलेला असतो. अनेकदा नैसर्गिक आपत्तीमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जात असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. आता पुन्हा अस्मानी संकटामुळे रंगनाथ ठाकरे या बळीराजाचा जीव गेल्यानं संपूर्ण चांदवड तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.