नाशिक :नाशिक मधील आर्टलरी ट्रेनिंग सेंटर परिसरात लष्करी अधिकारी असल्याचे सांगून फिरणाऱ्या एका तोतयाला लष्करी इंटेलिजन्स विभागाने अटक ( Fake Military officers Arrest In Nashik ) केली आहे. जवानांच्या नातलगांसाठी सुरू असलेल्या भरतीमध्ये तो मेजर दर्जाच्या अधिकाऱ्याचा गणवेश व त्यावर खोटा बॅच लावून वावरत होता. त्याच्याकडे लष्कराच्या प्रतिबंधित क्षेत्रातील छायाचित्र व व्हिडिओ आढळून आल्याने, हेरगिरीचा गुन्हा दाखल करण्यासाठी आता हालचाली सुरू झाल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, गणेश वाळू पवार ( रा. चांदवड, हरसूल) असे ताब्यात घेण्यात आलेल्या तोतयाचे नाव आहे. गणेशने लष्करात भरतीच्या नावाखाली बेरोजगार युवकांकडून 3 ते 15 लाख रुपये उकळ्याची माहिती समोर आली आहे. या पैशातून नाशिक येथे एक फ्लॅट सह आलिशान गाडी खरेदी गणेशने केली आहे. त्याच्या खाजगी वाहनांवर लष्करी पदवीचा लोगो लावून तो सर्वत्र वावरत होता
कानाखाली काढताच...
गणेश पवार आणि त्याचा ड्रायव्हर कॅम्प परिसरात भरतीसाठी आलेल्या मुलांकडून कागदपत्रे जमा करत होते. तेव्हाच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता युनिट ओळखपत्र, बॅच यााबाबत माहिती दिली नाही. तेव्हा तो तोतया असल्याचे स्पष्ट होताच वर्दी उतरून संतप्त लष्करी जवानाने त्याच्या कानाखाली आवाज काढला.