महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बंदुकीच्या धाकाने खंडणी मागणाऱ्या तिघांना नाशकात अटक - पिस्तूल

पोलिसांनी आरोपींकडून देशी बनावटीच्या पिस्तूलासह ३ जिवंत काडतूसे आणि एक दुचाकी गाडी जप्त केली आहे.

खंडणी प्रकरणी तिघे अटकेत

By

Published : Mar 26, 2019, 5:09 PM IST

नाशिक- मालेगाव शहरातील व्यापारी अंन्सारी सऊद यासिर अब्दुल कुट्टूस यांना खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी तिघा खंडणीखोरांना अटक केली. आरोपींनी अन्सारी यांना २१ मार्चला रात्रीच्या सुमारास ५ लाख रुपयांची खंडणी मागितली होती. पोलिसांनी आरोपींकडून देशी बनावटीच्या पिस्तूलासह ३ जिवंत काडतूसे आणि एक दुचाकी गाडी जप्त केली आहे.


गुरुवार २१ मार्चला रात्रीच्या सुमारास फिर्यादी अंन्सारी यांना अनोळखी व्यक्तीने फोन करून ५ लाख रुपयाची खंडणी मागणी केली. फोन करणाऱ्यांनी एक पाकिट अंन्सारीच्या घराजवळ ठेवले. त्या पाकिटात एक जिवंत काडतूस आणि उर्दू भाषेतून खंडणीच्या मागणीची चिठ्ठी होती. तसेच याविषयी पोलिसात तक्रार केल्यास आम्ही तुमच्या कुटुंबाचे बरेवाईट करू असा दमही फोनवरुन दिला होता. तेव्हा अंन्सारी यांनी या प्रकरणी मालेगाव येथील पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.


या प्रकरणी पवारवाडी पोलीस आरोपींचा शोध घेत ३ आरोपींना अटक केली. यात आरोपी अबुजर शकिल अहमद (वय २१, राहणार इस्लामपुरा शिष ), मोहम्मद अमर अंन्सारी (वय २०, राहणार खुशामत पुरा ) आणि मोहम्मद अनस अंन्सारी अब्दुल रब (वय २६ राहणार इस्लाम पुरा) यांना अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून खंडणीच्या गुन्हात वापरण्यात आलेला मुद्देमालही जप्त केला आहे. न्यायालयाने आरोपींना २७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

ABOUT THE AUTHOR

...view details