नाशिक (मनमाड) -केंद्र शासनाच्या आधारभूत धान्य खरेदी योजनेतून मका खरेदी करण्यात आली आहे. केंद्राने महाराष्ट्र राज्यासाठी 25 हजार मेट्रिक टन मका खरेदी करण्याची परवानगी दिली होती. त्यानुसार मका खरेदीचे उद्दिष्ट देखील पूर्ण करण्यात आले होते. परंतु, महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे चांगल्या प्रतीची मका भरपूर प्रमाणात शिल्लक आहे. ती विक्रीअभावी तशीच पडेल या चिंतेने शेतकऱ्यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. भारती पवार यांच्याकडे मका खरेदी मर्यादा वाढवण्याची मागणी केली होती. भारती पवार यांनी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी संपर्क करून याबाबत तातडीने निर्णय घेण्याची विनंती केली होती. त्यास केंद्राने मंजुरी दिली असल्याची माहिती भारती पवार यांनी दिली.
केंद्र सरकारने दिली मका खरेदीस मुदतवाढ, खासदार भारती पवार यांची मध्यस्थी.....
केंद्राने महाराष्ट्र राज्यासाठी 25 हजार मेट्रिक टन मका खरेदी करण्याची परवानगी दिली होती. त्यानुसार मका खरेदीचे उद्दिष्ट देखील पूर्ण करण्यात आले होते. परंतु, महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे चांगल्या प्रतीची मका भरपूर प्रमाणात शिल्लक आहे. त्यामुळे मका खरेदीला मुदतवाढ देण्यात आली आहे.
मका उत्पादक शेतकरी अडचणीत येत असताना त्यांना मका खरेदीची मर्यादा वाढवून मिळण्यासाठी भारती पवार यांनी केंद्राकडे आग्रही मागणी केली असता 24 जूनला केंद्रातील सार्वजनिक अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने 65 हजार मे. टन मका खरेदीची मर्यादा वाढवून देण्यात आली आहे. मका खरेदीसाठी शेतकऱ्यांना 15 जुलै 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मका खरेदीस केंद्राकडून महाराष्ट्र राज्याला 65 हजार मे.टन खरेदीस मर्यादा वाढवून दिल्याबद्दल भारती पवार यांनी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान आणि केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांचे तसेच पालकमंत्री यांचे आभार मानले.
केंद्रीय मंत्र्यांनी जो निर्णय घेतला त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे असलेली सर्व मका खरेदी करण्यासाठी 15 जुलैपर्यंत मुदतवाढ मिळाली असल्याने शेतकऱ्यांनी आंनद व्यक्त केला असून, याबाबत खासदार डॉ भारती पवार यांचे आभार मानले.