नाशिक - राजकारणात काहीही होऊ शकते, असे सूचक वक्तव्य माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी येथे केले आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस शिवसेनेसोबत जाणार का? या प्रश्नावर त्यांनी भविष्यातील घडामोडीवर सूचक वक्तव्य केले आहे. येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसेच सध्या दिवाळी सुरू झाली आहे. त्यामुळे लवकरच आम्ही एकत्रित येऊ, आणि योग्य तो निर्णय घेऊ असेही त्यांनी यावेळी सांगितले.
राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं; छगन भुजबळांचे सूचक वक्तव्य - chhagan bhujbal press conference nashik
जकारणात काहीही होऊ शकते, असे सूचक वक्तव्य माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी येथे केले आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस शिवसेनेसोबत जाणार का? या प्रश्नावर त्यांनी सूचक असे वक्तव्य केले आहे.
छगन भुजबळ
पत्रकार परिषदेतील मुद्दे -
- आगामी 5 वर्षात निश्चित उलाढाली होणार
- आदित्यच्या मुख्यमंत्री पदाबाबत आघाडी विचार करेल
- वाटेल तसे वागणे चालणार नाही, जनतेने भाजपला दाखवून दिले.
- नवीन नेत्यांचा पक्षवाढीसाठी उपयोग करू नवीन जबाबदाऱी देऊ
- भाजप सांगत होती स्वबळावर येऊ, मात्र, ते बरेच खाली आले
- काँग्रेस, राष्ट्रवादीने फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली
- आम्ही मजबूत आहोत असून सरकारवर अंकूश ठेवण्याचे काम करणार
- जनतेचे आभार, माध्यमांचे आभार
- वंचितचा फटका पंकज भुजबळांनाही बसला असल्याचे केले मान्य
- त्यांना सोबत घेण्याचे प्रयत्न केले होते. मात्र, त्यांच्या मागण्यांमध्ये सातत्य नव्हते... त्यांच्या अटीप्रमाणे आघाडीची इच्छाच नसल्याचे जाणवले
- ते आघाडीसोबत आले असते तर त्यांचेदेखील उमेदवार जिंकले असते आणि बीजेपी सत्तेपासून दूर गेली असती